Aryan drug : ‘अनन्या पांडेने आर्यन खानला गांजा पुरवला’

aryan shahrukh khan
aryan shahrukh khan

मुंबईतील एका क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडे ही अभिनेत्रीदेखील अडचणीत सापडलीय. ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान (Aryan drug) आणि अनन्या पांडे यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटचा खुलासा झाला आहे. या दोघांच्यातील चॅटच्या आधारे एनसीबी अनन्याची चौकशी करतेय. गुरुवारी, जवळपास तिची दोन तास कसून चौकशी करण्यात आली. (Aryan drug) आता तिला शुक्रवार दि. २२ रोजीदेखील एनसीबी ऑफिसला बोलावण्यात आलंय. दरम्यान, आर्यन खानला गांजा पुरवला असल्याचे अनन्या पांडेने म्हटलं आहे.

काय झाला खुलासा?

एनसीबी सूत्रांच्या माहितीनुसार, चॅटमध्ये आर्यनने अनन्याकडे गांजा मागितला होता. त्यावेळी चॅटमध्ये ती म्हणते-गरज पडली तर ती अरेंज करू शकते. रिपोर्ट्सनुसार, आर्यन-अनन्या यांच्यामध्ये ड्रग्जवरून चॅट झाल्याचा खुलासा झालाय.

'गांजा अरेंज करण्याविषयी अनन्या म्हणाली… '

आर्यन आणि अनन्या यांच्यामधील व्हॉट्सॲप चॅट एनसीबीला मिळाले. या प्रकरणाचा एनसीबी तपास करत आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, एनसीबी सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलंय की, आर्यनने अनन्याकडे गांजा मागितला होता. यावर अनन्याने म्हटलं होतं की, ती अरेंज करू शकेल. सूत्रांच्या माहितीनुसार, अनन्याची चौकशी करताना एनसीबीने तिला आर्यन खानसोबत झालेलं चॅट दाखवलं. अनन्याने लिहिलं होतं-I will raise' दरम्यान, आर्यनला ड्रग्ज अरेंज करून देण्याबाबतची गोष्ट तिने स्वीकारलीय. पण, याबाबतचा पुरावा अद्याप मिळालेला नाही.

अनन्याने मारली पलटी…

रिपोर्टनुसार, जेव्हा एनसीबीने अनन्याला याविषयी विचारलं. तेव्हा ती म्हणाली की, मी आर्यनची चेष्टा करत होते. मजेमजेत मी हे लिहिलं. अनन्या आणि आर्यन सातत्याने ड्रग्ज विषयी चॅट करत होते.

अनन्या – आर्यन खान चांगले मित्र

चंकी पांडेची मुलगी अनन्या, शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची जवळची मौत्रीण आहे. तसेच आर्यन खानचीदेखील चांगली मैत्रीण आहे.

एनसीबीने २ तास कसून केली चौकशी

२२ वर्षीय अनन्या पांडे गुरुवारी सायंकाळी ४ वाजता एनसीबी ऑफिस पोहोचली होती. जवळपास २ तासांच्या चौकशीनंतर सव्वा सहा वाजता ती बाहेर पडली. त्यावेळी तिच्यासोबत चंकी पांडेदेखील होते. त्याआधी सकाळी एनसीबीची एक टीम अनन्याच्या घरी पोहोचली होती. टीम शाहरुख खानचा बंगला मन्नत येथे दाखल झाली. त्यांनी मॅनेजरकडून आर्यन खान विषयी माहिती घेतली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news