नाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात सहा कामगार गंभीर जखमी - पुढारी

नाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात सहा कामगार गंभीर जखमी

पंचवटी ; पुढारी वृत्तसेवा :

पेठरोडवरील कुमावतनगर येथे आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास गॅसगळती झाली. यावेळी सिलींडरच्या स्फोटात ६ कामगार गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे सर्व जखमी परराज्यातील असून, मोलमजुरी निमित्त १० ते १५ वर्षांपासून ते नाशिकमध्ये स्थायिक झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पेठरोड, कुमावतनगर येथे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास टाइल्सची कामे करणाऱ्या कामगारांच्या रूममध्ये गॅस गळती झाली. यामध्ये गॅसचा भडका उडाला. गुरुवार (दि.२१) रात्री रूममधील सदस्यांकडून गॅसचे बटन व्यवस्थित बंद करण्याचे राहून गेले. त्यामुळे रात्रभर रूममध्ये गॅस पसरलेला होता. त्यातच सकाळी एकाने बिडी पेटविण्यासाठी माचिसची काडी पेटविताच गॅसचा भडका उडाला.

या भडक्‍याने खोलीतील लवलेश धरम पाल (रा.अलादातपूर, उत्तर प्रदेश), अखिलेश धरम पाल (रा. सदर), विजय पाल (फतेहपूर, उत्तरप्रदेश), संजय मौर्य (रा. अलादातपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश), अरविंद पाल (रा. इसापूर, फतेहपूर, उत्तरप्रदेश), वीरेंद्र कुमार (रा. बारमपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश) हे सर्व सहाजण गंभीर जखमी झाले. या सर्वांचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Back to top button