Arvind Kejriwal Arrest Updates | ‘केजरीवाल यांना आशीर्वाद द्या’; ‘आप’ने सुरु केली मोहीम

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आप'ने 'केजरीवाल यांना आशीर्वाद' द्या, अशी नवी मोहीम सुरु केली आहे. याबाबत आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, "मी तुम्हाला एक व्हॉट्सॲप नंबर देत आहे, या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही तुमच्या अरविंदजींना आशीर्वाद, शुभेच्छा, प्रार्थना किंवा कोणताही संदेश पाठवू शकता. मी तुरुंगात केजरीवाल यांना प्रत्येक संदेश देणार आहे. (Arvind Kejriwal Arrest Updates)

अरविंदजी देशभक्त : सुनिता केजरीवाल

कथित अबकारी धोरण घोटाळ्याच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अटनेनंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची आम आदमी पक्षातील सक्रियता सातत्याने वाढत आहे. केजरीवाल यांच्या अटकेबाबत केंद्र सरकारविरोधात त्यांनी आता पक्षाची नवी मोहीम सुरू केली आहे. 'केजरीवाल यांना आशीर्वाद' या मोहिमेचा शुभारंभ करताना सुनीता केजरीवाल यांनी व्हॉट्सॲप क्रमांक लोकांसाठी शेअर केला आहे. सुनिता केजरीवाल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हटलं आहे की, " अरविंदजींनी काल कोर्टात आपली बाजू मांडल्याचे तुम्ही ऐकले असेल. जर तुम्ही ऐकले नसेल तर कृपया ऐका. ते कोर्टासमोर जे बोलले त्याला खूप हिंमत लागते. ते खरे देशभक्त आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांच्या हुकूमशाहीविरुद्ध असाच लढा दिला. मी गेल्या 30 वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे. त्यांच्या मनात देशभक्ती आहे. अरविंदजींनी देशातील सर्वात शक्तिशाली, भ्रष्ट आणि हुकूमशाही शक्तींना आव्हान दिले आहे.

Arvind Kejriwal Arrest Updates | 'केजरीवाल यांना आशीर्वाद द्या'

सुनीता केजरीवाल यांनी एक व्हॉट्सॲप नंबर शेअर करत लोकांना अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा पाठवण्याचेही आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या 'तुम्ही अरविंदजींना तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा मानले आहे. या लढ्यात तुम्ही तुमच्या मुलाला आणि भावाला साथ देणार नाही का? आपण सर्व मिळून ही लढाई लढू, असा मला पूर्ण विश्वास आहे. आजपासून आम्ही एक मोहीम सुरू करत आहोत, ज्याचे नाव आहे केजरीवाल यांना आशीर्वाद.  मी तुम्हाला एक व्हॉट्सॲप नंबर देत आहे, 8297324624. या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही तुमच्या अरविंदला आशीर्वाद, शुभेच्छा, प्रार्थना किंवा कोणताही संदेश पाठवू शकता. मी तुरुंगात केजरीवाल यांना प्रत्येक संदेश देणार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news