Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजप सत्तेसाठी” | पुढारी

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, "भाजप सत्तेसाठी"

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी आम्ही गंभीरपणे उभे राहणार आहे. ९० टक्के मते त्यांना पडतात. त्यांचे नेतृत्त्व दिल्लीतील लोकांना मान्य आहे. केजरीवालांना अटक केल्याच्या घटनेचा मी निषेध करतो. अस वक्तव्य शऱद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले. ते बारामतीतून बोलत होते. (Arvind Kejriwal)

Arvind Kejriwal : केजरीवालांची अटक चुकी…

कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (दि.२१) अटक करण्यात आलेली आहे. ईडीने  गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर कार्यकर्ते आक्रमक झाले दरम्यान केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या आप कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या अटकेनंतर विवीध स्तरातुन संमिश्र भावना व्यक्त केल्या जावू लागल्या आहेत.

केजरीवाल यांच्या अटकेनंतर शरद पवार म्हणाले, ” अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहणार आहे. ९० टक्के मते त्यांना पडतात. त्यांचे नेतृत्त्व दिल्लीतील लोकांना मान्य आहे. केजरीवालांना अटक केल्याच्या घटनेचा मी निषेध करतो. अस वक्तव्य शऱद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांना अटक करणे चुकीचे आहे. धोरण तयार करण्याचा अधिकार त्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा असतो. पण एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे हे अधिकाराचा गैरवापर आहे. ईडी, सीबीआयचा प्रचंड गैरवापर होतोय. धोरण ठरवले म्हणून अटक करणे चुकीचे आहे. विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी तपास यंत्रणाचा वापर केला जात आहे. जनतेने एकत्र येऊन सरकारला धडा शिकवावा. लोकशाहीचा गळा दाबला जातोय हे स्पष्ट दिसतेय. “

भाजप सत्तेसाठी अजुन किती झुकणार

दरम्यान शरद पवार यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ‘X’ पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्यावर विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सींच्या प्रतिशोधात्मक गैरवापराचा तीव्र निषेध. भाजप सत्तेसाठी अजुन किती झुकणार हे या अटकेवरून दिसून येते. अरविंद केजरीवाल यांच्यावरील या असंवैधानिक कारवाई विरोधात ‘भारत’ एकजुटीने उभा आहे.

हेही वाचा

Back to top button