पुढारी ऑनलाईन : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) अटकेविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावतीने न्यायालयात गेलेले वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, केजरीवाल सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेत आहेत. (Arvind Kejriwal Arrest updates)
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. दरम्यान, केजरीवाल यांनी ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. पण ही याचिक त्यांनी मागे घेतली आहे.
केजरीवाल यांनी गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. आज शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मद्य धोरण घोटाळाप्रकरणी 'ईडी'ने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 'आप'च्या अन्य नेत्यांना यापूर्वीच अटक केली आहे. 'ईडी'ने आतापर्यंत केजरीवाल यांना चौकशीसाठी ९ वेळा समन्स बजावले होते. त्यांनी 'ईडी'च्या नोटिसा आणि अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर 'ईडी'ने गुरुवारी रात्री त्यांना अटक केली. (Arvind Kejriwal Arrest updates)
दरम्यान. केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आपने शुक्रवारी दिल्लीत जोरदार निर्देशने सुरु केली आहेत. केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात केल्या जाणाऱ्या निदर्शनादरम्यान दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना पोलिसांनी दिल्लीतील आयटीओ येथे ताब्यात घेतले.
हे ही वाचा :