Tirumala temple : भाविकाकडून तिरुपती मंदिरात ३ कोटींचे सोन्‍याचे दागिने दान

तिरुपती मंदिरात
भाविकाने दान केलेले सुवर्ण हस्त.
तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलेले सुवर्ण हस्त.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशातील सर्वात श्रीमंत देवस्‍थान, अशी ओळख असलेल्‍या तिरुपती मंदिरात ( Tirumala temple ) एका भाविकाने 'सुवर्ण हस्त' दान केले आहेत. ५.३ किलो सोने आणि हिर्‍यांनी सजलेल्‍या या सुवर्ण हस्‍तांची किंमत सुमारे ३ कोटी रुपये आहे. भाविकाने नवस पूर्ण झाल्‍याने मंदिरात दान दिले असून आपली ओळख गुप्‍त ठेवली आहे, अशी माहिती मंदिर व्‍यवस्‍थापनाच्‍या अधिकार्‍यांनी दिले.

भाविकाने दिलेले सुवर्ण हस्त हे श्री.व्‍यंकटेश्‍वरला ( Tirumala temple ) अर्पण करण्‍यात आले आहेत. ३ कोटींचे सुवर्ण हस्त दान करणारे भाविक हे मागील ५० वर्षांपासून श्री व्‍यंकटेश्‍वराची पूजा करत आहेत, अशी माहितीही तिरुपती मंदिर व्‍यवस्‍थापनाच्‍या अधिकार्‍यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी एका भाविकाने तिरुपती मंदिराला २ कोटी रुपयांचे सोन्‍याचा शंख आणि चक्र दान केले होते. कोरोनामधून बरे झाल्‍यानंतर त्‍यांनी आपला नवस पूर्ण केला होता. तिरुपती मंदिरात सर्वाधिक सोने दान हाेते. येथे दरराेज हजाराे  भाविक दर्शनासाठी येतात.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news