मुंबई; पुढारी ऑनलाईन : एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराच्या दिशेने दगडफेक केली. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे. या प्रकरणावर बोलताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची चौकशी होईल, तसेच यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल. एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करावा व २२ तारखेपर्यंत पुन्हा कामावर हजर व्हावे, असे देखील आव्हान अनिल परब यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या घरावर केलेल्या हल्ल्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारणा केल्यावर त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी अनिल परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांबाबत शासनाने अत्यंत संवेदनशीलपणे पाऊल उचलले आहे. त्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आले आहेत. त्यांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. न्यायालायाने दिलेल्या आदेशाप्रमाणे देखिल त्यांना अन्य लाभ देण्यात येणार आहेत. त्यांनी आपले आंदोलन थांबवून कामावर हजर व्हावे असे आवाहन परब यांनी केले.
अनिल परब पुढे म्हणाले, पवार साहेबांच्या घरावर केलेल्या हल्ल्याची चौकशी करण्यात येईल. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. एसटी ही अत्यावश्यक सेवेत येते. त्यामुळे आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याद्वारे कारवाई करता आली असती. पण, आम्ही अत्यंत संवेदनशीलपणे त्यांच्या आंदोलनाकडे पाहिले आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई केली नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा आदर करावा व कामावर रुजू व्हावे, असे ही मंत्री परब म्हणाले.
अधिक वाचा :