एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे कोण ? याचा शोध घेणार : गृहमंत्री वळसे पाटील | पुढारी

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे कोण ? याचा शोध घेणार : गृहमंत्री वळसे पाटील

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : एसटी महामंडळाचं राज्‍य शासनात विलीनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी आक्रमक झालेल्‍या एसटी कर्मचाऱ्यांनी आज (शुक्रवार) थेट राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्‍व्हर ओक’ या निवासस्‍थानासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पलफेक करण्यात आली.

यावेळी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक घोषणाबाजीही करण्यात आली. या घटनेनंतर या आंदोलनामागे कोण आहे? याचा शोध घेणार असल्‍याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारा कोणीही मोठा नेता नव्हता. त्यामुळे या आंदोलकांना कोणी भडकवले का? एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामागे कोण आहेत? याचा शोध मुंबई पोलिस घेणार आहेत. कोणाच्या सांगण्यावरून आंदोलक सिल्‍व्हर ओकवर आले या बद्दलची चौकशी केली जाणार असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

या घटनेबद्दल गृहमंत्री वळसे पाटील यांनी ट्वीट करत प्रतिक्रिय दिली आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला लागलेले वळण चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अनाठायी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे गरजेचे आहे. संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत अशी भूमीका वळसे पाटील यांनी मांडली.

Back to top button