Anil Jaisinghani Case : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण; बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक 

Anil Jaisinghani Case : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण; बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक 
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांच्या लाचेसह बुकींची माहिती देण्याची ऑफर देत व्हिडीओ क्लिप्स, ऑडिओ मेसेज आणि अन्य मेसेज पाठवून १० कोटींच्या खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधील कलोल येथून गुजरात पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. त्याचबरोबर आणखी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, तांत्रिक बाबींची मदत घेवून ओळख लपवत होता. तब्बल ७२ तास गुजरातमध्ये तो पोलिसांना चकवा देत होता. त्याच्या कडून एमएच ४८ पासिंगची कार ताब्यात घेण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक मोबाईल, डॉंगल, अन्य उपकरणेही ताब्यात घेतली आहे. तो शिर्डीमार्गे गुजरातला रवाना झाला होता. मिळालेल्या पुराव्यांचा तपास सुरु आहे.

वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याची फॅशन डिझायनर मुलगी अनिक्षा विरोधात २० फेब्रुवारीला गुन्हा दाखल केल्यानंतर मलबार हिल पोलिसांनी गेल्या गुरुवारी (दि.१५) अनिक्षाला उल्हासनगरातील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. तिला सत्र न्यायालयाने २१ मार्चपर्यंत कोठडीचे आदेश दिले आहेत. मुलीच्या अटकेनंतर अनिल जयसिंघानी याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमच्यावर अन्याय झाला आहे. मी काही बोलल्यास मुलीला कोठडीत त्रास होईल. माझ्या मुलीवर केलेली केस पूर्णपणे बोगस आहे. अनिक्षाला पोलीस कोठडीच्या बाहेर येऊ द्या. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. असा दावा केला होता.

Anil Jaisinghani Case : गुजरातमधून अटक

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनिल जयसिंघानी यांची माहिती मिळवत गुजरातमध्ये शोध मोहीम राबवून त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. अनिल जयसिंघानी हा गेली काही वर्षे अंडरग्राऊंड झाला होता. अखेर तो गुन्हे शाखेच्या हाती लागला असून त्याच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

फॅशन डिझायनर म्हणून अमृता फडणवीस यांची भेट घेत ओळख वाढवून अनिक्षा जयसिंघानी हिने आपल्या वडिलांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यासाठी त्यांना ०१ कोटींची ऑफर दिली होती. पुढे तिने अमृता फडणवीस यांना २२ पाठवून १० कोटींची खंडणी मागीतल्याचा आरोप आहे. तसेच, हा एक कट असून यामागे काही बड्या राजकीय व्यक्तींचाही सहभाग असण्याची दाट शक्यता असल्याचा दावा करण्यात येत आहे.

कोण आहे अनिल जयसिंघानी?

२०१५ मध्ये उल्हासनगरातील कुख्यात क्रिकेट बुकी अनिल जसयसिंघानी याला त्याच्या गोलमैदान परिसरातील घरावर ईडीने छापा टाकत ताब्यात घेतले होते. हा कारवाई आयपीएल क्रिकेट मॅचमधील सट्टा बाजार आणि बेकायदेशीर मनी लाॅंडरिंग प्रकरणाशी संबंधित होती. अनिल जयसिंघानी हा राष्ट्रवादी  काॅंग्रेसचा माजी नगरसेवक आहे. त्याने अनेकवेळा निवडणूक लढली. पण तो जिंकू शकला नाही. अनिल जयसिंघानीवर क्रिकेट बेटिंगचे अनेक गंभीर गुन्हे उल्हासनगर व मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मुंबईच्या आझादनगर पोलीस ठाण्यात फसवणूक, खोटे दस्तऐवज सादर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते. त्यानंतर न्यायालयाने उल्हासनगर कॅम्प 2 येथील गोल मैदान परिसरात मोहन लाईफ स्टाईल या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेला फ्लॅट 18 ऑक्टोबर 2018 सील केला होता. याच फ्लॅटमध्ये 2019 मध्ये चोरी झाली होती. विशेष म्हणजे त्याचा हा फ्लॅट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news