Deepak Tijori : बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीची कोट्यवधीची फसवणूक; सहनिर्मात्यावर गुन्हा दाखल

Deepak Tijori : बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीची कोट्यवधीची फसवणूक; सहनिर्मात्यावर गुन्हा दाखल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरी याने फसवणुकीप्रकरणी चित्रपट सहनिर्मात्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. सहनिर्माता मोहन नादर याच्याविरूद्ध आंबोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

अभिनेता दीपक तिजोरी याने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका थ्रिलर चित्रपटाच्या निर्मितीसाठी सहनिर्माता मोहन नादर याने २.६ कोटी रूपये घेत, फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. अभिनेत्याच्या या तक्रारीवरून आंबोली पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी कलम ४२० आणि ४०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे देखील मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

तक्रार करण्याऱ्या अभिनेत्याने सांगितले आहे की, २०१९ ला लंडनंध्ये एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. दरम्यान, सहनिर्माता नादर यांनी २.६ कोटी रूपये परत देण्याच्या आश्वासनावर घेतले होते. दरम्यान हा प्रकल्प पूर्ण न करताच, तो अर्धवट सोडला. त्यानंतर वारंवार आश्वासन देऊनही त्याने पैसे परत दिले नाहीत. तो पैसे देण्याचा फक्त बहाणा करत राहिला आणि चेक बांउन्स होत राहिले, अशी तक्रार अभिनेत्याने केली आहे. याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news