Former CJI U U Lalit : ‘न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धतच उत्तम’; माजी CJI यूयू लळित यांचे मत

uu lalit
uu lalit
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Former CJI U U Lalit न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धतच उत्तम असून ती एक आदर्श पद्धत आहे, असे मत माजी सरन्यायाधीश यू यू लळित यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी कॉलेजियम पद्धतीचा बचाव करताना म्हटले की, एखाद्या उमेदवाराबद्दल कोण जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. जो प्रत्यक्ष त्यांचे कामकाज पाहत आहे, का जे दिल्लीत बसले आहेत, अशा प्रश्नार्थक स्वरुपात त्यांनी कॉलेजिमय पद्धत उत्तम असल्याचे म्हटले आहे.

49 वे सरन्यायाधीश यूयू लळित Former CJI U U Lalit यांनी त्यांच्या कारकीर्दीतील महत्वपूर्ण न्याय-निवाडे तसेच विवादित प्रकरणे याविषयी सांगितले. त्यांनी यावेळी जेल ऐवजी बेल या फॉर्म्यूलावरही भाष्य केले. माजी सरन्यायाधीश लळित हे एक उत्कृष्ट क्रिमिनल वकील राहिले आहे. या दरम्यान त्यांनी 2 जी घोटाळ्या सारख्या प्रकरणांमध्ये युक्तिवाद केला आहे. न्यायमूर्ती यूयू लळित हे घटनापीठ, लाइव्ह स्ट्रीमिंग, सर्वोच्च न्यायालयातील नियमित खटले यासारख्या मोठ्या निर्णयांसाठी ओळखले जातात. सर्वोच्च न्यायालयात अजूनही अनेक सुधारणांची गरज असल्याचे ते म्हणाले.

कॉलेजियम पद्धतीबाबत ते पुढे म्हणाले की, यापेक्षा जास्त चांगली आणखी कोणतीही पद्धत असू शकत नाही. ही पद्धत एक आदर्श पद्धत आहे. आपल्याला न्यायाधीशांची प्रत्येक स्तरावर गरज आहे आणि ही पद्धत सर्वोत्तम संभावित योग्यतेला पुढे आणण्यासाठीच बनवण्यात आली आहे.

Former CJI U U Lalit जामीनाचे नियम

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने 'जामीन आणि तुरुंगाचा नियम' अपवादावर आणि अनावश्यक अटक टाळण्यासाठी स्वतंत्र जामीन कायद्याचा प्रसिद्ध निर्णय दिला होता. यावर माजी सरन्यायाधीश ललित म्हणाले की, जामीन देण्याचा निर्णय न्यायाधीशांच्या विवेकबुद्धीवर अवलंबून आहे. दुसरे कारण म्हणजे वैधानिक तरतुदी, ज्यामुळे जामीन देणे अधिक कठीण होते. कोणत्याही एका प्रकरणाच्या आधारे आरोप करू नयेत, असेही ते म्हणाले.

2G घोटाळा हे सर्वात कठीण प्रकरण होते- Former CJI U U Lalit

या कार्यक्रमात माजी CJI UU ललित म्हणाले की 2G घोटाळा प्रकरण त्यांच्यासाठी सर्वात मोठे प्रकरण आहे. 2G घोटाळा 1.76 लाख कोटींचा होता, ज्यामध्ये राजकारणी आणि सरकारी अधिकारी सहभागी होते. टूजी घोटाळा प्रकरणात बरीच कागदपत्रे होती आणि ती हाताळणे सर्वात कठीण असल्याचे ते म्हणाले. खटल्याची कागदपत्रे लाखो पानांची होती आणि आम्ही खटला बंद केला तोपर्यंत 150 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news