Ananya Pandey : ‘लोक विसरतात की कलाकारही माणसं असतात’

Ananya Pandey : ‘लोक विसरतात की कलाकारही माणसं असतात’

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अनन्या पांडे (Ananya Pandey)  तिच्या 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. 'ड्रीम गर्ल 2' मध्ये ती छोट्या शहरातील मुलीची भूमिकेत दिसणार आहे.

अनन्या पांडेने (Ananya Pandey) 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तीने तिच्या 4 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनन्या (Ananya Pandey) आता 'ड्रीम गर्ल 2' सोबत कंटेंट आधारित चित्रपटात काम करणार आहे आणि तिने त्याबद्दल माध्यमांशी संवाद साधला.

'ड्रीम गर्ल 2' बद्दल उत्साहित आहे, अनन्या

अनन्याने (Ananya Pandey) म्‍हणाली की, ती 'ड्रीम गर्ल 2' बद्दल उत्साहित आहे. कंटेंटवर आधारित चित्रपट आणि परफॉर्मन्स ओरिएंटेड अभिनेता आयुष्मान खुरानासोबत काम करण्यात ती आनंदी आहे. पुढे बोलताना ती म्‍हणाली, 'हे मला वेगळ्या दिशेने घेऊन जाते आणि माझ्या फिल्मोग्राफीशी जोडले आहे. हे एका वेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना लक्ष्य करत आहे.

लोकांनी मला सुरूवातीपासूनच केले ट्रोल

अनन्या ही चंकी पांडेची मुलगी आहे आणि तिने 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ इयर 2' मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा तिला घराणेशाहीमुळे खूप ट्रोल केले गेले. सोशल मीडियावर लोकांनी चांगलेच घेरले. 'फीडबॅक आणि निगेटिव्ह ट्रोलिंगमध्ये एक रेषा आहे. लोक जर टीकाच असतील मी त्‍यासाठी नेहती तयार आहे, असे ती म्‍हणाली.

लोक हे विसरतात की अभिनेतेही माणूसच असतात!

सोशल मीडियावर ट्रोल होण्याने अनन्याला काही फरक पडतो का या प्रश्न तीला विचारला असता ती म्हणाली की, एक अभिनेत्री असल्याने ट्रोलिंगचा तिच्यावर फारसा परिणाम होत नाही, पण एक माणूस असल्याने तिचा तिच्यावर खूप परिणाम होतो. लोक हे विसरतात की अभिनेतेही माणूसच असतात हे लोक विसरतात असे ती म्‍हणाली.

.हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news