पत्नीच्या साडीने केला शेजाऱ्याचा घात; पतीने झाडली गोळी | पुढारी

पत्नीच्या साडीने केला शेजाऱ्याचा घात; पतीने झाडली गोळी

गुरुग्राम : पत्नीची साडी चोरणार्‍या शेजार्‍याला गोळी घालून ठार केल्याची खळबळजनक घटना गुरुग्राम येथे घडली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. नाथापूर या खेड्यात ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, अजय सिंग या 50 वर्षीय सिक्युरिटी गार्डने ही हत्या केली.

अजयची पत्नी रीना हिने त्याच्याकडे तक्रार केली की शेजारी राहणार्‍या पिंटू कुमार याने बाहेर वाळत टाकलेली साडी चोरून नेली. कामावरून परत आल्यावर या विषयावरून अजय व पिंटू यांच्यात भांडण झाले. पिंटूने आपण साडी चोरली नसल्याचे सांगितले. यावरून अजय व पिंटू यांच्यात जोरदार शिवीगाळ व धक्काबुक्की झाली. या नंतर अजय घरात गेला व आपली डबल बॅरल बंदूक घेऊन आला आाणि त्याने पिंटूवर गोळी झाडली. त्याच्या पोटात गोळी लागली. यानंतर तेथे गोंधळ उडाला व अजय पळून गेला. पिंटूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अजयला दुसर्‍या दिवशी अटक केली. त्याच्याकडून बंदूकही जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button