Amit Thackeray : मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

Amit Thackeray : मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष तथा युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) मंगळवार(दि.२६)पासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते नाशिक लोकसभा मतदारसंघातील तब्बल ३५ गणेश मंडळांना भेटी देणार असून यामाध्यमातून मनसेचे ब्रॅण्डींग केले जाणार आहे.

संबधित बातम्या :

ओबीसी आरक्षण तसेच प्रभागरचनेच्या घोळामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. या निवडणुकांपूर्वी लोकसभा निवडणूका होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या बंडानंतर राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर पोहचले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. भाजपपाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार गट आणि शिवसेना शिंदे गटासह उद्धव ठाकरे गटानेही लोकसभा निवडणुकांवर आता लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मनसेनेही आता या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकणाच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे यांनी राज्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले असून त्यात नाशिकचाही समावेश केला आहे. नाशिक लोकसभेची जबाबदारी ठाकरेनी युवा नेते अमित ठाकरेंवर सोपवली असून ठाकरेंनीही नाशिकमधील आपले दौरे वाढवत, संघटना मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. ऑगस्टमध्ये अमित ठाकरेंनी नाशिक जिल्ह्यात महासंपर्क अभियान राबविले होते. त्यानंतर पंधरा दिवसापूर्वी त्यांनी नाशिक मध्ये येऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत शाखा प्रमुखांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यानंतर आता मंगळवार (दि.२६) व बुधवारी (दि.२७) असे दोन दिवस ते नाशिकमध्ये तळ ठोकणार आहेत. (Amit Thackeray)

३५ मंडळाना भेटी देणार 

या दोन दिवसीय दौऱ्यात अमित ठाकरे (Amit Thackeray) नाशिक व सिन्नर मधील सुमारे ३५ प्रमुख गणेश मंडळांना भेटी देवून बाप्पांचे दर्शन घेणार आहेत. मंगळवारी (दि.२६) ते नाशिकरोड, अंबडगाव, इंदीरानगर, सिडको, गंगापूररोड या भागातील १६ गणेश मंडळांना भेटी देतील. त्यानंतर बुधवारी (दि.२७) सिन्नर, सातपूर, मखमलाबाद, भगूर, देवळाली कॅम्प, पळसे भागातील जळपास १९ गणेश मंडळांना भेटी देवून बाप्पाचे दर्शन घेणार आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news