पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी माझ्याविरुद्ध हैदराबाद मतदारसंघात निवडणूक लढवावी, असे आव्हान 'एआयएमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (AIMIM chief, Asaduddin Owaisi ) यांनी दिले आहे.
हैदराबाद येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, राहुल गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणूक वायनाडमधून नव्हे तर हैदराबादमधून लढवावी (अबकी बार वायनाड नाही, अबकी बार हैदराबाद ). राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
राहुल गांधींनी केली होती 'एआयएमआयएम'वर टीका
गेल्या आठवड्यात तुक्कुगुडा येथे एका मेळाव्यात बोलताना राहुल गांधी म्हणाले होती की, "एआयएमआयएमवर कोणताही खटला नाही. विरोधकांवरच हल्लाबोल केला जातो. कधीही आपल्या लोकांवर हल्ला करत नाहीत. ते (भाजप) तुमचे मुख्यमंत्री आणि एआयएमआयएम नेत्यांना स्वतःचे मानते. म्हणूनच त्यांच्याविरुद्ध कोणताही खटला नाही.तेलंगणात काँग्रेस फक्त सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (BRS) यांच्यासह भाजप आणि 'एआयएमआयएम'सोबत देखील लढत आहे. ते एकमेकांना वेगळे पक्ष म्हणतात; पण ते संगनमताने काम करत आहेत,असा आरोपही राहुल गांधींनी केला होता.
हेही वाचा :