PM Modi| काँग्रेसचा ठेका अर्बन नक्षलवाद्यांकडे; पंतप्रधान मोदींचा घणाघात | पुढारी

PM Modi| काँग्रेसचा ठेका अर्बन नक्षलवाद्यांकडे; पंतप्रधान मोदींचा घणाघात

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसने आपला ठेका इतरांना देऊन टाकला आहे. काँग्रेसचा ठेका काही अर्बन नक्षलवाद्यांकडे आहे. तेच काँग्रेसची धोरणे बनवत आहेत, याचा अनुभव आता तळागाळातील काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला येऊ लागला आहे. काँग्रेसमध्ये नियत आणि इच्छाशक्तीचा अभाव आहे. परंतु आमचा मिजाज आणि मिशन वेगळे आहे. आपल्या देशापेक्षा मोठे काही नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी (PM Modi)  यांनी आज (दि.२५) केले.

भोपाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या महाकुंभाला संबोधित केले. जांबोरी मैदानावरील या महाकुंभ परिषदेला १० लाखांहून अधिक लोक आल्याचा दावा भाजपने केला आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या समारोपानंतर कार्यकर्ता महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. (PM Modi)

संबंधित बातम्या

गर्विष्ठ महाआघाडीतील लोक नारी शक्ती वंदन विधेयकावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना नारी शक्ती विधेयकाचे मजबुरीने समर्थन करावे लागत आहे. या विधेयकाबाबत आम्ही जी हमी दिली होती, ती पूर्ण झाली आहे. नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाले आहे. दशकांपासून देशातील महिला याची वाट पाहत होत्या.

PM Modi : साडेतेरा कोटी लोक गरिबी रेषेतून बाहेर पडले

काँग्रेसने ५० वर्षांपूर्वी गरीबी हटाओचा नारा दिला होता. काँग्रेसने आपला हा वादा पूर्ण केला का ?, असा सवाल पंतप्रधान मोदींनी यावेळी केला. भाजप सरकारच्या काळात साडेतेरा कोटी लोक दारिद्रय रेषेतून बाहेर पडले आहेत. गरिबांच्या कल्याणासाठी सरकार काम करत आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने अशी व्यवस्था बनवली आहे की, गरीब नेहमी गरिबीतच राहावा. त्यांना गरिबीत जगण्यास भाग पाडले आहे. काँग्रेस नेहमी त्यांना रोटी, कपडा आणि मकानमध्ये गुंतवून ठेवले आहे. ज्या अडचणींना तुमच्या आधीच्या पिढ्यांना सामोरे जावे लागले आहे. त्या अडचणी दूर करण्याची व्यवस्था भाजपच्या डबल इंजिन सरकारने केली आहे.

तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी बोला. तुमच्या पालकांना, आजी-आजोबांना गरिबीत ठेवण्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. त्यांना संकटात ठेवण्यासाठी एकमेव काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेस फक्त एक कुटुंबाचे गौरवगान करण्यात गुंतली आहे, असा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.

Back to top button