Udhayanidhi Stalin : उदयनिधींवर आक्षेपार्ह वक्तव्य, तामिळनाडूत हिंदुत्ववादी नेत्याला अटक  

Udhayanidhi Stalin : उदयनिधींवर आक्षेपार्ह  वक्तव्य, तामिळनाडूत हिंदुत्ववादी नेत्याला अटक  

पुढारी ऑनलाईन डेस्क : द्रमुकचे नेते आणि  मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्याबद्दल आक्षेपार्ह  वक्तव्य केल्याप्रकरणी तामिळनाडूतील अरणी येथील हिंदू मुन्नानी संघटनेचे नेते महेश यांना अटक करण्‍यात आली आहे. उदयनिधी यांनी 'सनातन धर्मा'विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी महेश यांनी केली होती. (Udhayanidhi Stalin)

Udhayanidhi Stalin :  महेश यांनी केले हाेते आक्षेपार्ह वक्तव्य

 विनायक चतुर्थी उत्सवादरम्यान शुक्रवार, २२ सप्टेंबर रोजी हिंदू मुन्नानी संघटनेचे नेते महेश यांनी उदयनिधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी द्रमुकचे जिल्हा प्रमुख एसी मणी यांनी अरणी पोलिसांकडे  तक्रार केली होती. या तक्रारीनुसार महेश यांना अटक करण्‍यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी महेश यांना त्याच्या निवासस्थानी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्‍यांना अटक करण्‍यात आली.  धार्मिक भावना दुखावणे आणि प्रक्षोभक भाषण आदी आराेप त्‍यांच्‍यवर आहेत.

उदयनिधी यांनी माफी मागावी : महेश

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महेश यांनी सांगितले की,"मंचावरील माझ्या भाषणादरम्यान, मी उदयनिधींनी सनातन धर्माविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याची गरज व्यक्त केली होती. उदयनिधी यांनी त्यांच्या वक्तव्यात 'निर्मूलन' हा शब्द वापरल्यामुळे मी त्यांच्यावर कलम ३०२ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली".

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news