भाजप ४०० पारच्या दिशेने, पहिल्या दोन टप्प्यातच १०० हून अधिक जागा; अमित शाह यांचा दावा

भाजप ४०० पारच्या दिशेने, पहिल्या दोन टप्प्यातच १०० हून अधिक जागा; अमित शाह यांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात भाजप १०० हून अधिक जागा जिंकत असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. अंतर्गत सर्वेक्षणाच्या आधारे निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांनंतर आम्ही आणि आमचे मित्रपक्ष १०० पेक्षा जास्त जागा जिंकू. दक्षिण भारतात भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही ४०० च्या पुढे जाऊ, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024)

आसाममध्ये एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "४०० जागा पार केल्यानंतर भाजप आरक्षण संपवेल अशी चुकीची माहिती काँग्रेस पसरवत आहे. या गोष्टी निराधार आणि तथ्यहीन आहेत. आम्ही मतदारांकडे कधीच अल्पसंख्याक आणि बहुसंख्य या दृष्टिकोनातून पाहत नाही. प्रत्येक व्यक्ती भारताचा नागरिक आहे आणि त्याला तशी वागणूक दिली पाहिजे. भाजप अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा समर्थक आहे. अनुसूचित जाती आणि ओबीसींचा संरक्षक म्हणून नेहमीच भूमिका बजावेल, असे ते म्हणाले.

अमेठी आणि रायबरेलीमधून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना शाह म्हणाले की, "ते निवडणूक लढवतील की नाही हे मला माहीत नाही, परंतु त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता असल्याचे दिसून येते. उत्तर प्रदेशात ते त्यांच्या पारंपरिक जागा सोडून पळून गेले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

फेक व्हिडिओबाबत म्हणाले…

अमित शाह यांच्या भाषणाचा फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता, याबाबत बोलताना ते म्हणाले की, विरोधकांची निराशा एवढ्या खालच्या पातळीवर पोहोचली आहे की त्यांनी माझे आणि काही भाजप नेत्यांचे खोटे व्हिडिओ व्हायरल केले आहेत. त्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आदींनीही हा फेक व्हिडिओ फॉरवर्ड करण्याचे काम केले आहे. सुदैवाने मी जे बोललो तेही रेकॉर्ड झाले. आम्ही ते रेकॉर्ड सर्वांसमोर ठेवले, ज्यामुळे सर्व काही स्पष्ट झाले आणि आज काँग्रेसचे प्रमुख नेते गुन्हेगारी गुन्ह्यांना सामोरे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news