हिवाळी अधिवेशन : टाळी एका हाताने वाजत नाही; काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

हिवाळी अधिवेशन : टाळी एका हाताने वाजत नाही; काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन:  संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्याआधी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. या बैठकीत संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती बिर्ला यांनी केली.

काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'आम्ही चर्चेला तयार आहोत, आम्ही सहकार्य करू पण सरकारनेही सर्वांना सोबत घेऊन चालले पाहिजे, असे अध्यक्षांना सांगितले आहे. बैठकीत आम्ही महागाई, बेरोजगारी आदी मुद्दे मांडले. टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे सरकारनेही या मुद्द्यांवर चर्चा करायला हवी.'

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले, सर्वपक्षीय बैक झाली. तसेच एनडीएच्या सहकारी पक्षांचीही बैठक झाली. सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला तयार आहे. आम्ही विरोधकांना अपील केले आहे चर्चा करा, आम्ही चर्चेला उत्तर देऊ.'

या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषी कायदे मागे घेणारे विधेयक मांडले जाणार आहे. मात्र, एमएसपी, लखीमपूर खिरी प्रकरण आणि शेकऱ्यांच्या मृत्यूंवर विरोधक पहिल्याच दिवशी घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार बॅकफूटवर आहे.

या अधिवेशनात महागाई, इंधन दरवाढ, कृषी कायदे आणि अन्य विषयांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. सभापती ओम बिर्ला यांनी केलेल्या आवाहनला कितपत प्रतिसाद मिळतो हे उद्याच्या अधिवेशनात दिसून येईल.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news