‘मंत्री गुलाबराव पाटील’ यांची सून होणार एका शेतकऱ्याची मुलगी | पुढारी

'मंत्री गुलाबराव पाटील' यांची सून होणार एका शेतकऱ्याची मुलगी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेची खानदेशी तोफ म्हणून ओळख असलेले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी, जमिनीशी व गावाची नाळ लग्नसमारंभात ही कायम ठेवली आहे. त्यांनी आपल्या लहान मुलाचे लग्न सर्वसामान्य कामगार व शेतकरी असलेल्या घरातील मुलीशी विवाह संबंध जोडला. ज्या गावाने आमदारकी पासून मंत्री पदापर्यंत कायम साथ दिली, त्याच गावात हा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडत आहे. आज या ठिकाणी ना. एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली तर ऐन वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा रद्द झाला.

शिवसेनेचे तोफ म्हणून खानदेशात नव्हे तर राज्यात आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे लहान सुपुत्र विक्रम हे सोमवारी दिनांक 29 रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

संबंधित बातम्या

नेहमी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे शिंगाडा मोर्चा काढण्यासाठी  प्रसिद्ध नामदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुलाची सोयरीक सुद्धा एका सर्वसामान्य शेतकरी व कामगार असलेल्या चोपडा तालुक्यातील सनफुले गावातील भगवान भिका पाटील यांची कन्या प्रेरणा यांच्याशी होणार आहे.

घरातील सर्वात लहान मुलाचे लग्न असल्याने कोणताही मोठा लवाजमा न करता, अत्यंत साध्या पद्धतीने लग्न सोहळा पार पडत आहे. पाळधी गावाशी असलेली नामदार गुलाबराव पाटील यांची नाळ त्यांनी या लग्न सोहळ्याच्या निमीत्तानेही कायम ठेवली. हा विवाह सोहळा पाळधी येथील श्री साईबाबा मंदिर येथे संपन्न होणार आहे.

आज झालेल्या हळदीच्या कार्यक्रमाला नामदार एकनाथराव शिंदे यांनी हजेरी लावून, वधू वरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने ते येवू शकले नाहीत. विवाह सोहळ्यासाठी नामदार छगन भुजबळ, नामदार नबाब मलिक, नामदार दादा भुसे यांच्यासह सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा :

Back to top button