Akshay Kumar : अक्षय आता चित्रपटासाठी १०० कोटी घेणार नाही!

Akshay Kumar : अक्षय आता चित्रपटासाठी १०० कोटी घेणार नाही!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्कः 'खिलाडी' नावाने प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. अनेक हिट चित्रपट देणारा अक्षय कुमार (Akshay Kumar ) प्रत्येक चित्रपटासाठी १०० कोटी रुपये घेतो. पण आता नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार, चित्रपटासाठी एवढी मोठी रक्कम घेणार नसल्याचे त्याने सांगितले. एका कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटाच्या फीबद्दल खुलेपणाने सांगितले. (Akshay Kumar )

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा प्रसिद्ध कलाकार आहे. वर्षभरात चार ते पाच चित्रपट देणारा अक्षय सर्वांचाच लाडका आहे. मात्र, २०२२ हे वर्ष त्याच्यासाठी फारसे चांगले राहिलेले नाही. प्रदर्शित झालेले सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. त्याची जादू बॉक्स ऑफिसवर अजिबात चालली नाही. मात्र, त्याने आपली फी कमी केली नाही. तो एका चित्रपटासाठी १०० कोटी ते १३५ कोटी रुपये घेतो. मात्र, आता तो आपली फी कमी करणार असल्याचे सांगत आहे.

अक्षय कुमार साऊथ सुपरस्टार राम चरणसोबत 'एका वृत्तपत्रा'च्या कार्यक्रमात पोहोचला होता. तिथे तो म्हणाला की, उद्योगातील सध्याच्या गोष्टी बदलण्याची गरज आहे.

अक्षय कुमारने त्याची फी कमी केली

अक्षय कुमारच्या मते, 'अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केवळ अभिनेत्यांनीच नव्हे तर निर्माते आणि थिएटरलाही कराव्या लागतील. मला माझी फी ३०-४०% कमी करायची आहे. चित्रपटगृहांनी हे समजून घेतले पाहिजे की अजूनही मंदीचा काळ आहे. प्रेक्षकांकडे मनोरंजनावर खर्च करण्यासाठी मर्यादित पैसे आहेत. तो त्यावर इतका खर्च करू शकत नाही. सर्व काही बदलावे लागेल.

अक्षय कुमार एका वर्षात फक्त चार चित्रपट करणार आहे

एका वर्षात चार चित्रपट केल्याबद्दल अक्षय कुमार म्हणाला- 'मला एक गोष्ट सांगा. इथे कोणी आहे का जो आपल्या मुलांना सांगतात की ते  इतके काम का करतात? लोक विचारतात तू एवढा जुगार का खेळतोस? एवढं का पितोस? जर नाही तर जास्त काम करत असताना कोणीही विचारत नाही की, इतकं काम मी का करतोय? तो आतापर्यंत जेवढे चित्रपट करत होता तेवढेच चित्रपट करत राहणार असल्याचे अक्षयने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news