Akshay Kumar : महेश मांजरेकरांच्या चित्रपटात अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

akshay kumar and mahesh manjarekar
akshay kumar and mahesh manjarekar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारचे संपूर्ण वर्ष बॉक्स ऑफिसवर चित्रपटांच्या बाबतीत खूपच वाईट गेले. (Akshay Kumar) या वर्षी प्रदर्शित झालेल्या अक्षयचे सर्व चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले आहेत. 'बच्चन पांडे'पासून सुरू झालेला हा फ्लॉप प्रवास 'राम सेतू'ला जाऊनही संपला नाही. 'राम सेतू' चित्रपटगृहांमध्ये अजूनही कायम असला तरी त्याचा प्रेक्षक दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. हा चित्रपटही फ्लॉपच्या यादीत जाणार आहे. बॉलीवूडमधील अक्षयच्या चित्रपटांचा आलेख सातत्याने घसरत असतानाच आता अक्षय आणखी एका इंडस्ट्रीत नशीब आजमावण्यासाठी निघाला आहे. अक्षयने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची घोषणा केली आहे. (Akshay Kumar)

चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही अक्षय कुमार चित्रपट साइन करण्यापासून मागे हटत नाही. खिलाडी कुमार सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट साईन करत असतो. या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सम्राट पृथ्वीराज'मध्ये अक्षय कुमारने ऐतिहासिक भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा तो ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. वास्तविक, अक्षय कुमार महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटातून तो मराठी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटात हा अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news