नितीश कुमारांबरोबरील भेटीनंतर अखिलेश पोहचले लालूप्रसादांच्‍या भेटीला! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नितीश कुमारांबरोबरील भेटीनंतर अखिलेश पोहचले लालूप्रसादांच्‍या भेटीला! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज ( दि. २७ ) दिल्लीत राष्‍ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यापूर्वी अखिलेश यांनी बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमारांची भेट घेतली होती. यानंतर तत्‍काळ ते लालूपसाद यादव यांच्‍या भेटीला आल्‍याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अखिलेश यादव हे लालू यादव यांना भेटण्यासाठी त्‍यांच्‍या मुलगी मीसा भारती यांच्या घरी पोहोचले. दोघांमध्ये सुमारे वीस मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अखिलेश यांनी लालूप्राद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचवेळी त्यांनी ट्विटरवर भेटीचा फोटो शेअर करताना त्याचे वर्णन 'कुशलक्षेम बैठक' असे केले आहे. मात्र, राजकीय वर्तुळात ही बैठक आगामी लोकसभा निवडणुकीच्‍या रणनीतीसाठी घेतली गेल्‍याची चर्चा आहे.

एक महिन्‍यात दुसर्‍यांदा भेट

मार्च महिन्‍यात अखिलेश यादव पत्नी डिंपल यादव यांच्‍यासोबत लालू प्रसाद यादव यांना भेटायला आले होते. त्याचवेळी नुकतेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधी पक्षनेत्यांना जाऊन विरोधी ऐक्याचा संदेश दिला. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना भाजपच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. याच काळात नितीश कुमार यांनी दिल्लीतील राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती.
नितीश कुमार २५ एप्रिल रोजी लखनौमध्ये होते, जिथे त्यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली. यावेळी लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही उपस्थित होते. यापूर्वी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. आता अखिलेश आणि लालूप्रसाद यादव यांच्या भेटीने भाजपविरोधात महाआघाडीची चर्चा तीव्र झाली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news