अर्थभान : ‘एआयएस’ करदात्यांसाठी महत्त्वाचे दस्तावेज, जाणून घ्‍या सविस्‍तर

अर्थभान : ‘एआयएस’ करदात्यांसाठी महत्त्वाचे दस्तावेज, जाणून घ्‍या सविस्‍तर

गेल्या काही वर्षात 'एआयएस' व्यवस्था ही करदात्यांसाठी महत्त्वाचे दस्तावेज बनलेले आहे. 'एआयएस' म्हणजे ॲन्यूअल इन्फॉरमेशन स्टेटमेंट. यात एका आर्थिक वर्षातील करदात्याच्या व्यवहाराची माहिती नमूद केलेली असते. हे एक प्रकारचे कन्सोलिडेटेड स्टेटमेंट आहे. प्राप्तीकर खात्याकडून करदात्याचे एआयएस तयार केले जाते. त्यात एका आर्थिक वर्षात सर्वाधिक मूल्यांच्या व्यवहाराची माहिती असते. या फॉर्मला २६ एएसचे अपग्रेड व्हर्जन म्हणूनही ओळखले जाते. 'एआयएस'च्या माध्यमातून आपण उत्पन्न आणि कपात जाणून घेऊ शकता. आपल्याला काही गडबड वाटत असेल तर ते दुरुस्त करू शकता. ही कृती आयटीआर भरण्यापूर्वी करावी लागेल.

एआयएसमध्ये काय काय असते

एआयएस सुविधा ही करचुकवेगिरी रोखण्यासाठी फायदेशीर आहे. कारण यात करदात्याशी संबंधित सर्व प्रकारच्या उच्च मूल्यांच्या व्यवहाराची माहिती दिलेली असते. याचा वापर करदात्याचा कॅपिटल गेन किंवा लॉस यावर लक्ष ठेवण्यासाठी देखील करता येते. ही सुविधा गुंतवणुकीला विकताना करदात्याला मदत करते. यात काही महत्त्वाची माहिती असते. जसे की टीडीएस, टीसीएस, स्पेशिफाइड फायनान्शियल ट्रान्झेक्शन (एसएफटी), टॅक्सचे पेमेंट, डिमांड आणि रिफंड्स, पेंडिंग आणि कप्लिटेड प्रोसिडिंग्ज याचा समावेश असतो.
इन्कम आणि टॅक्स पेमेंटच्या व्हेरिफिकेशनसाठी उपयुक्त 'एआयएस'मध्ये अनेक प्रकारच्या माहितीचा उल्लेख असल्याने वर्षभरातील उत्पन्न आणि टॅक्स पेमेंट्स यास क्रॉस व्हेरिफाय करण्याची मदत मिळते. परिणामी आयटीआर भरताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहण्याची शंका कमी राहते. ही माहिती प्राप्तीकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर देखील उपलब्ध आहे. करदाते ऑनलाइन देखील पाहू शकतात आणि ते डाऊनलोडही करू शकतात.

एआयएस अॅक्सेस कसा करावा

एआयएस पाहण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. आपण त्यास ई फायलिंग पोर्टलवरून डाऊनलोड करू शकता. आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून प्राप्तीकर विभागाच्या पोर्टलवर लॉग इन करतो तेव्हा आपल्याला सर्व्हिस टॅबमध्ये एआयएस दिसेल. प्रत्येक तिमाहीला एआयएसला अपडेट करण्यात येते. पण एखाद्या करदात्याच्या फायनान्शियल ट्रान्झेक्शनमध्ये बदल होत असेल तर ते तातडीने अपडेट केले जाते.

'टॅक्स कंम्प्लायन्स' वाढविण्यासाठी उपयुक्त

'टॅक्स कंम्प्लायन्स' (कर पूर्तता) करण्यासाठी एआयएसने मोठी भूमिका बजावली आहे. यात प्राप्तीकर खात्याला करदात्याच्या उच्च मूल्यांच्या व्यवहाराचे आकलन होते आणि त्यामुळे करचुकवेगिरीला आळा बसला आहे. कर नियोजनासाठी देखील ही सुविधा महत्त्वाची आहे. यानुसार आपल्याला आर्थिक व्यवहाराची ढोबळ माहिती मिळते आणि त्यानुसार कराचे आकलन करणे सोयीचे जाते. गुंतवणुकीबाबत आपण निर्णय घेऊ शकता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news