वेध शेअर बाजाराचा : सर्व क्षेत्रीय निर्देशांकही तेजीमध्ये | पुढारी

वेध शेअर बाजाराचा : सर्व क्षेत्रीय निर्देशांकही तेजीमध्ये

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

गुरुवार दिनांक २७ जुलै रोजी Monthly Expiry पार पडली. निफ्टी ५० एक महिन्यात ४.४०% नी वाढून १९६६४.०५ वर, बँक निफ्टी ३.०५ वाढून ४५४६८.१० वर तर सेन्सेक्स ४.३३% नी वाढून ६६१६०.२० वर बंद झाला. या महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख निर्देशांकांसहीत सर्व क्षेत्रीय निर्देशांकही Sectoral Indices तेजीमध्ये बंद झाले.

निफ्टी-मीडिया सर्वात अधिक १७ टक्के वाढला. झी लिमिटेडचा शेअर एका महिन्यात ३६ टक्के वाढला. सोनी बरोबर तिचे रखडलेले विलीनीकरण लवकरच पूर्णत्वास जाऊन नवीन व्यवस्थापनाखाली कंपनी बहरास येईल, असे विश्वास गुंतवणूकदारांना वाटत असावा. सन टीव्ही चा शेअरही २४ टक्के वाढला.

निफ्टी पीएसयू बँक हा निर्देशांक महिन्यात साडे चौदा टक्के वाढला. इंडियन बँक, महाराष्ट्र बँक, पंजाब नॅशनल बँक हे सर्व शेअर्स वीस टक्क्यांहून अधिक वाढले. बँक ऑफ इंडियाही १६ टक्के वाढला.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) जुलैमध्येही १६२३४.३६ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. मे आणि जून महिन्यांपेक्षा ती थोडी कमीच आहे. देशी संस्थांनी मात्र (DII) विक्री करणे पसंत केले. त्यांनी ५१८५.७३ रू. ची निव्वळ विक्री केली.

गोड फ्रे फिलीप्स या कंपनीचा शेअर जुलै महिन्यात २६ टक्के वाढून शुक्रवार २८ जुलै रोजी २०७३ वर बंद झाला. आणि आता तो २१४९ ह्या त्याच्या वर्षभरातील नीचांक नोंदवला होता. म्हणजे एक वर्षाच्या आत हा शेअर दुप्पट झाला आहे. सिगारेट, वेव्हरेजीस आणि रिटेल सेक्टरमधील ही अतिशय उच्च दर्जाची कंपनी आहे. मार्लबरो, फोर स्क्वेअर, रेड अँड व्हाईट आदी जगप्रसिद्ध ब्रेडची ती ओनर आहे. कंपनीचा पी ई रेशो १२ आहे. हा शेअरही आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवा.

२०२३ – २४ ह्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या निकालांचे सत्र जोमात सुरू आहे. रिलायन्सच्या Consolidated Net Profit मध्ये ५.९% घट झाली आहे. टाटा मोटर्सने मागील वर्षाच्या loss विरुद्ध ह्या वर्षी ३२०२.८० कोटी रुपयांचा net Profit नोंदवला आहे. बजाज फायनान्सच्या निव्वळ नफ्यात ३२.३८ टक्के तर एकत्रित उत्पन्नात ३४.६२ टक्के वाढ झाली आहे. बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद बँक, अॅक्सीस बँक, भारत पेट्रोलियम, नेस्ले, डॉ. रेड्डीज यांनी चांगले निकाल दिले तर टाटा स्टीलच्या निव्वळ नफ्यात ९२ टक्के घट झाली. टेक महिंद्राचा नफाही ३९ टक्के घसरला. बँक ऑफ इंडियाचा नफा तिप्पट वाढला. युनियन बँकेचाही नफा दुप्पट झाला आहे. आयटीसी आपला हॉटेल व्यवसाय स्वतंत्र करणार आहे. सध्या कंपनी FMCG, Hotels, Peper Pack Maging, Agri आणि IT ह्या सहा क्षेत्रांमध्ये काम करते. कंपनीच्या एकूण नफ्यामध्ये सिगारेटस्चा वाटा ७६ टक्के तर हॉटेल व्यवसायाचा केवळ २ टक्के आहे. आता हॉटेल व्यवसायासाठी आयटीसीची नवीन कंपनी होईल. सध्या आयटीसीचा हॉटेल व्यवसाय टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल्सच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जागतिक स्तरावर यूरोपियन सेंट्रल बँके ने सलग ९ व्यांदा व्याज दर ०.२५ टक्क्यांनी वाढवले तर अमेरिकेच्या फेड रिझर्व्हनेही सलग अकरावी ०.०५ टक्के दरवाढ जाहीर केली. परंतु Infiation आणि Jobiess Claims च्या आघाडीवर अमेरिकेत नुकतीच जाहीर झालेली आकडेवारी अत्यंत सुखावह आहे.

भारतातील Chemicals आणि Petrochemicals सेक्टरसाठी एक आंनदाची वार्ता आहे. ह्या सेक्टरला शासनाने PLI (Production Linked Incentive) स्कीम लागू करण्याबाबत विचार विनिमय सुरू केला आहे. उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, आयात कमी करण्यासाठी आणि भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून त्यासाठी उत्पादन क्षेत्रातील १३ उद्योगांची निवड करण्यात आली आहे. केमिकल्स आणि पेट्रो केमिकल्स सेक्टरला सरकार कडून PLI चा बुस्टर मिळाला तर ह्या सेक्टरमधील कंपन्यांना बहार येईल.

पनामा पेट्रोकेम लि. ही ह्याच क्षेत्रातील एक कंपनी आहे. विविध उद्योगांना लागणारी ऑइल्स आणि वॅक्सेस ती बनवते. सातत्याने नफा कमविणारी आणि डिव्हीडंड देणारी ही कर्जमुक्त कंपनी आहे. ३० टक्के ROE अणि तेव्हडीच Profit Growth असणाऱ्या पनामा पेट्रोच्या शेअरचा शुक्रवारचा बंद भाव रुपये २९१.३० आहे. वर्षभरातील उच्चांक आणि निचांक अनुक्रमे रु. ४२५ आणि रु. २६८ आहे. म्हणजे आज हा शेअर जवळपास निचांकाजवळ मिळत आहे. मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी हा शेअर आज घेण्यासारखा आहे.

Back to top button