PPF Account : ‘पीपीएफ’च्या मुदतवाढीविषयी…

PPF Account : ‘पीपीएफ’च्या मुदतवाढीविषयी…

विधिषा देशपांडे

पब्लिक प्रॉव्हिडंड फंड अर्थात पीपीएफ खाते बँक किंवा पोस्टात सुरू करता येते. आपणही पीपीएफ खात्यात गुंतवणूक करत असाल आणि पंधरा वर्षांनंतरही त्यात योगदान सुरूच ठेवायचे असेल तर त्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे.

पीपीएफ खात्याला पाच पाच वर्षाच्या टप्प्याने मुदतवाढ देता येते. म्हणजे पंधरा वर्षांनंतरही पीपीएफ खाते सुरू ठेवायचे असेल तर या खात्याला किमान पाच वर्षे आणि नंतर पुन्हा पाच वर्षे अशी कितीदाही ही योजना सुरू करू शकता. खाते सुरू केल्यानंतर १५ वर्षे पाहावे लागत नाही. नंतर एक्स्टेक्शनसाठी अर्ज करावा लागतो. या खात्याला मुदतवाढ देण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे योगदानासह पाच पाच वर्षाच्या ब्लॉकमध्ये एक्स्टेंड करणे आणि दुसरे म्हणजे पैसे न टाकता खाते सक्रिय ठेवणे.

पंधरा वर्षाच्या मॅच्योरिटीनंतर पीपीएफ खात्यात योगदान सुरूच ठेवायचे असेल तर अर्ज द्यावा लागेल. हा अर्ज संबंधित बँकेत किंवा पोस्टात द्यावा लागेल. मुदत पूर्ण झाल्यानंतर वेळोवेळी अर्ज भरला नाही तर खात्यात योगदान देऊ शकणार नाही. पंधरा वर्षांनंतर खाते मॅच्योर झाल्यानंतर रक्कम काढत नसाल आणि अर्ज न 'भरताही योगदान देत नसाल तर आपल्या खात्याला आपोआपच मुदतवाढ मिळते. याचा फायदा म्हणजे पीपीएफ खात्यात जेवढी रक्कम जमा असेल, त्यावर पीपीएफच्या आकलनानुसार दरवर्षी व्याज जमा होत राहते आणि करसवलतही मिळते. याशिवाय या खात्यातून कधीही कितीही पैसा काढू शकतो. गरज भासल्यास संपूर्ण पैसे काढू शकता.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news