आयएएस अतहर खान यांचा हॅण्डसम लूक पाहून तरुणी फिदा

आयएएस अतहर खान यांचा हॅण्डसम लूक पाहून तरुणी फिदा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सोशल मीडिया ही अलिकडील काळात अशी जागा आहे जिथे सर्व जण आपले फोटो व्हिडीओ व अन्य गोष्‍टी व्हायरल करत असतात. आजकाल यूपीएससीचे टॉपर्स इंटरनेटवर खूप चर्चेत आहेत. यामध्ये कधी त्यांच्या लग्नाबद्दल तर कधी त्यांच्या लुकमधील व्हायरल होत आहेत. अलीकडेच, आयएएस टीना डाबी यांच्या दुसऱ्या लग्नामुळे त्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

दरम्‍यान, त्‍यांचा पहिले पती आयएएस अतहर आमिर खान हे सध्या चर्चेत आहे. अतहर आमिर खान सोशल मीडियावर खूप ॲक्‍टीव्ह असतात. तसेच त्‍यांचे नविन फोटो ते शेअर करत असतात. तर लोक त्‍याच्या फोटोला पसंती करत कौतुक ही करत आहेत.

तसेच, खान यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्सही आहेत. इन्स्टाग्रामवर जवळपास 6 लाखांहून अधिक आणि फेसबुकवर 1.5 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. आणि त्यांच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते हॅण्डसम लूकमध्ये दिसत आहेत.

अतहर यांनी स्वतःचा फोटो शेअर केला आणि या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्‍यांच्या या फोटोला जवळपास दीड लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर कमेंट्सचा जणू महापूरच येत आहे. यातील कमेंटसमध्ये मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. अतहर यांचा हा लूक पाहून मुलीही त्याच्यावर फिदा झाल्‍या आहेत. आणि ब-याच मुलींनी त्यांना लग्नासाठी प्रपोजही केले आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news