अपहरण प्रकरणी माजी मंत्री अमरमणी त्रिपाठींना मोठा झटका, मालमत्ता जप्‍त

अपहरण प्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मंत्री अमरमणी त्रिपाठी यांची मालमत्ता आज (दि.१३ एप्रिल) प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार जप्‍त केली.  नौतनवा शहरातील अमरमणी त्रिपाठी यांच्या निवासस्थानाला पोलीस छावणीचे स्‍वरुप प्राप्‍त झाले आहे.
अपहरण प्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मंत्री अमरमणी त्रिपाठी यांची मालमत्ता आज (दि.१३ एप्रिल) प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार जप्‍त केली. नौतनवा शहरातील अमरमणी त्रिपाठी यांच्या निवासस्थानाला पोलीस छावणीचे स्‍वरुप प्राप्‍त झाले आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अपहरण प्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मंत्री अमरमणी त्रिपाठी यांना आज (दि.१३ एप्रिल) मोठा झटका बसला. प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार त्‍यांची मालमत्ता जप्‍त केली आहे. नौतनवा शहरातील अमरमणी त्रिपाठी यांच्या निवासस्थानाला पोलीस छावणीचे स्‍वरुप प्राप्‍त झाले आहे.

काय आहे प्रकरण ?

6 डिसेंबर 2001 रोजी व्यापारी धर्मराज मधेशिया यांचा मुलगा राहुल याचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अमरमणीसह नऊ जणांना आरोपी केले होते.

लखनौमधील ज्या घरातून अपहरण झालेले मूल सापडले ते घर तत्कालीन मंत्री अमरमणी यांचे असल्याचा आरोप आहे. अमरमणी विरुद्ध 24 ऑक्टोबर 2011 पासून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.अमरमनी फरार आहेत. या प्रकरण त्‍यांनी आत्मसमर्पण केले नाही, त्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त केली जात आहे.

कवयित्री मधुमिता शुक्लाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले अमरमणी त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मधुमणी त्रिपाठी यांच्या सुटकेचे आदेश मागील वर्षी उत्तर प्रदेश तुरुंग प्रशासन विभागाने दिले होते. . या दोघांचेही तुरुंगातील वर्तन चांगले असल्याने दोघांची उर्वरित शिक्षा रद्द करण्यात आली होती. राज्यपालांच्या परवानगीने तुरुंग प्रशासनाने या दोघांच्या सुटकेचा आदेश जारी केला होता.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news