शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना संजय सिंह म्हणाले की, "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केंद्र सरकारच्या आदेशानुसार तिहार तुरुंगात छळ होत आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना प्रत्यक्ष भेटण्यासही नकार दिल्याचेही संजय सिंह म्हणाले. तिहार तुरुंग प्रशासनाने केजरीवाल यांना केंद्र सरकारच्या सांगण्यावरून चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर निशाणा साधला. तुरुंगात केजरीवाल यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तिहार तुरुंगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होत असेल असेल. तुरुंगाच्या नियमानुसार, कोणीही तुरुंगात समोरासमोर भेटू शकतो, मात्र अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला समोरासमोर भेटू दिले जात नाही, त्यांचे आजारी असलेले आई-वडील त्यांना तुरुंगात भेटायला आले असताना, त्यांना समोरासमोर भेटता येणार नसल्याचे सांगण्यात आले," असेही केजरीवाल म्हणाले.