पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाती सिडनी शहरातील बाँडी जंक्शन येथील एका शॉपिंग सेंटरमध्ये एका माथेफिरूने केलेल्या चाकूहल्ल्यात ६ जणांचा बळी गेला. पण हा हल्ला होत असताना एका महिला पोलिस अधिकाऱ्याने धाडसाने आणि प्रसंगावधान राखत या हल्लेखोराचा खातमा केला. या महिला अधिकऱ्याने एकटीनेच हल्लेखोराला रोखले आणि मोठी जीवितहानी टाळली. (Sydney Attack)
या हल्लेखोराने ऑस्ट्रेलियन रग्बी संघाची जर्सी परिधान केली होती. या महिला अधिकाऱ्याने कशा प्रकारे हल्लेखोराला मारले याची माहिती या शॉपिंग स्टोअरचे मालक मायकेल डंक्ली यांनी दिली आहे. ही बातमी इंडिया टुडे या वेबसाईटवर दिली आहे. (Sydney Attack)
सुरुवातीला या महिला अधिकाऱ्याने हल्लेखोराला चाकू टाकून देण्यास सांगितले, पण त्याने ते ऐकले नाही. तेव्हा या अधिकाऱ्याने हल्लेखोराच्या दिशेने एक गोळी झाडली. ही गोळी थेट हल्लेखोराच्या छातीत घुसली आणि हल्लेखोर जागेवरच मारला गेला, असे डंक्ली यांनी म्हटले आहे. या महिला अधिकाऱ्याचे कारवाई करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, पण तिचे नाव अजून समोर आलेले नाही. (Sydney Attack)
या हल्ल्यात ६ नागरिक ठार झाले तर काही लोक जखमी आहेत. मृतांत एका ३८ वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. ही महिला तिच्या लहान बाळासह खरेदीसाठी आली होती. तिच्यावर चाकूहल्ला होत असताना तिने अत्यंत धाडसाने तिच्या बाळाला दुसऱ्या माणसाच्या हाती सोपवले. पण या गडबडीत बाळालाही चाकू लागला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा