Elon Musk India Visit | एलन मस्क यांच्या भारत भेटीकडे जगाचे लक्ष; टेस्लासह स्टार लिंकची घोषणा शक्य | पुढारी

Elon Musk India Visit | एलन मस्क यांच्या भारत भेटीकडे जगाचे लक्ष; टेस्लासह स्टार लिंकची घोषणा शक्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : अब्जाधिश उद्योगपती आणि टेस्ला या कारसाठी जगप्रसिद्ध असलेले एलन मस्क या महिना अखेरीस भारत भेटीवर येत आहेत. या भेटीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांत जगभरात मानदंड निर्माण केलेल्या टेस्ला कारचे भारतात उत्पादन आणि उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट पुरवणारी स्टार लिंक ही सेवा भारतात सुरू करण्याबद्दल मोठी घोषणा या दौऱ्यात होणे अपेक्षित आहे. (Elon Musk India Visit)

या भेटीतून बड्या गुंतवणूकदार कंपन्यांना भारतात आकर्षिक करण्याच्या सरकारच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब होऊ शकणार आहे, तसेच भारत एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून जगासमोर येणार आहे. त्यामुळे मस्क यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
भारताने इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. भारतात आजच्या घडीला २ टक्के इलेक्ट्रिक कार आहेत, तर सरकारेच उद्दिष्ट हे प्रमाण २०३०पर्यंत ३० टक्के करण्याचे आहेत. यासाठी जागतिक पातळीवर बड्या कंपन्यांनी भारतात कार निर्मिती करावी अशा प्रकारे धोरण आखण्यात आले आहे. (Elon Musk India Visit)

भारताने मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा चालना देण्यासाठीही मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड इनेस्टिव्ह स्किमही लागू करण्यात आलेली आहे.

एलन मस्क यांची स्टार लिंक नावाची कंपनीही प्रसिद्ध आहे. ही कंपनी उपग्रहांच्या माध्यमातून वेगवान इंटरनेट सेवा पुरवते. भारतातील दुर्गम भागात इंटरनेट नेण्यासाठी स्टार लिंक फार मोठी भूमिका बजावू शकते.

हेही वाचा

Back to top button