Adani Foundation helps mountaineer Anurag Maloo | दरीत कोसळलेल्या गिर्यारोहकाच्या मदतीला धावले गौतम अदानी, काठमांडूतून केले एअरलिप्ट

Adani Foundation
Adani Foundation

पुढारी ऑनलाईन : गेल्या महिन्यात नेपाळ येथे गिर्यारोहक अनुराग मालू (mountaineer Anurag Maloo) हे गिर्यारोहनादरम्यान पर्वतावरून उतरताना खोल दरीत पडले. यानंतर ते काही दिवस बेपत्ता होते. त्यांचा शोध घेऊन त्यांना वाचवण्यात आले आहे. परंतु या अपघातात गिर्यारोहक अनुराग हे गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर अनुराग यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी उद्योगपती गौतम अदानी (Adani Foundation) हे पुढे सरसावले आहेत. त्यांनी या गिर्यारोहकाला काठमांडूतून दिल्लीतील रूग्णालयात आणण्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली आहे, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

गेल्या महिन्यात १७ एप्रिल रोजी गिर्यारोहक अनुराग मालू हे नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतावरील कॅम्प III वरून खाली उतरत होते. दरम्यान ते 5,800 मीटर उंचीवरून खोल दरीत पडले. ते काही दिवस बेपत्ता होते. मात्र शोध घेतल्यानंतर ते जखमी अवस्थेत आढळले. या अपघातातून बचावलेल्या गिर्यारोहक अनुराग मालू यांना वैद्यकिय उपचारासाठी विशेष विमानातून काठमांडूहून दिल्लीतील एम्स रूग्णालयात (Adani Foundation) आणले जात आहे. यासाठी अदानी ग्रुपचे मालक उद्योगपती गौतम अदानी आणि अदानी फाऊंडेशन सरसावलेत. (Adani Foundation helps mountaineer Anurag Maloo)

गिर्यारोहक अनुराग मालू हे राजस्थानमधील किशनगडचे रहिवासी आहेत. अनुराग यांच्या अपघातानंतर गौतम अदानी आणि अदानी फाऊंडेशनने केलेल्या मदतीमुळे गिर्यारोहक अनुराग यांचे भाऊ आशिष मालू यांनी ट्विटरवरून आभार मानले आहे. योग्यवेळी मदतीला धावून येत, दिलेल्या पाठिंब्यामुळे गिर्यारोहक अनुराग मालू यांच्या कुटुंबाने उद्योगपती अदानी आणि त्यांच्या फाऊंडेशनविषयी कृतज्ञता (Adani Foundation) व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news