पुढारी ऑनलाईन : हिंडनेबर्ग या संस्थेने दिलेल्या अहवालानंतर अदानी समूहच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. नव्याने घडलेल्या घडमोडीत अदानी समूहाला डी. बी. पॉवर ही कंपनी विकत घेण्याचा व्यवहार थांबवावा लागला आहे. हा व्यवहार ७,०१७ कोटी रुपयांचा आहे. हा व्यवहार पूर्ण करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी होती. त्यामुळे हा व्यवहार होऊ शकणार नसल्याचे अदानी समूहाने कळवले आहे.
डी. बी. पॉवर हा उद्योग समूह औष्णिक ऊर्जा निर्मितीत कार्यरत आहे. हा उद्योग समूह ताब्यात घेतल्यानंतर अदानी समूह औष्णिक ऊर्जा क्षेत्रातील आघाडीचा समूह बनला असता. हा व्यवहार न होणे अदानी समूहासाठी मोठा सेट बॅक मानला जात आहे.
२०२२मध्ये अदानी समूहाने डी. बी. पॉवर उद्योग ताब्यात घेण्याची घोषणा केली होती. अदानी पॉवरची औष्णिक ऊर्जा निर्मिती क्षमता १३.६GW इतकी आहे. तसेच सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता ४०MW इतकी आहे. तसेच अदानी पॉवरवर ३६,०३१ कोटी इतके कर्ज आहे.
दुसरा मोठा झटका
हिंडनेबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाला रद्द करावा लागलेला हा दुसरा व्यवहार आहे. अदानी समूहाने यापूर्वी २० हजार कोटींचा फॉलो अप पब्लिक ऑफरिंग रद्द केली होती.
हेही वाचा