पुढारी ऑनलाईन डेस्क : देव माणूस या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सोनाली पाटील हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये गेल्यानंतर सोनालीने सर्वांकडून कौतुकाची थाप पाठीवर मारून घेतली. मूळची कोल्हापूरची असणारी सोनाली देव माणूस या मालिकेत एका वकिलाच्या भूमिकेत दिसली होती.
देवमाणूस या मालिकेत सोनालीने वकील आर्याची भूमिका साकारली होती. सोनाली पाटील हिने देवमाणूससोबतचं वैजू नं १ मालिकेत काम केलं आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घातली. तिचा जन्म ५ मे रोजी महाराष्ट्रातील लातूर येथे झाला. तिचे मूळ गाव महाराष्ट्रातील कोल्हापूरचे आहे. तिने आपले शिक्षण ताराराणी विद्यापीठ, उषाराजे हायस्कूलमधून केले. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून आपले महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले. पुढे एमए आणि बीएड पदवी घेतली आहे.
तिने 'वैजू नंबर वन' मालिकेतून मराठी कलाविश्वात पदार्पण केले होते. सोनाली 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी होणारी पहिली स्पर्धक ठरली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी सोनालीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोनालीने तिच्या ड्रेसिंग रुममध्ये एक व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये ती पांडू चित्रपटातील बुरुम बुरुम, या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
"आपल्या @avadhoot_gupte मर्दाच गाणं हाय आणं मी ह्या रील नाय करणार व्हय? कोण तयार हाय माझ्या बुलेटवर 'बुरुम बुरुम' करायले कमेंट मध्ये सांगा बिगीबिगी!, " असं कॅप्शन सोनालीने या पोस्टला दिलं आहे. तिच्या या व्हिडिओला अवधूत गुप्ते, सोनाली कुलकर्णी यांनी कमेंट केल्या आहेत.
हेही वाचा;