Mumbai on High Alert : मुंबईत खलिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता, हाय अलर्ट जारी | पुढारी

Mumbai on High Alert : मुंबईत खलिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता, हाय अलर्ट जारी

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची मुंबई पोलिसांना माहिती मिळाली आहे. खलिस्तानी दहशतवादी मुंबईवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी आज (दि.३०) हाय अलर्ट जारी केला आहे. (Mumbai on High Alert)

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, गुप्तहेरांच्या माहितीनुसार मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्या अनुशंगाने मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैणात करण्यात आला आहे.

Mumbai on High Alert : पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

दरम्यान, आजपासून पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि मुंबईत असलेला प्रत्येक पोलिस कर्मचारी ड्युटीवर असेल असेही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आल्या आहेत.

मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त क्वेसर खालिद यांनी सांगितले की, मुंबईतील सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानक, दादर, वांद्रे चर्चगेट, सीएसएमटी, कुर्ला आणि इतर स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शुक्रवारी ३ हजारहून अधिक रेल्वे अधिकारी विविध संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button