पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठीची प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची ( Prarthana Behere ) चित्रपट असो वा मालिका तिच्या अभिनयाची जादू कायमच आहे. अभिनयासोबत तिच्या सौदर्यांच्या प्रेमात असंख्य चाहते बुडाले आहेत. प्रार्थनाच्या वैयक्तीक आयुष्यात म्हणजे, खास करून नेहमी लग्नाच्या विषयावरील चर्चाना उधाण आलं असते. याच दरम्यान प्रार्थना प्रेग्नेंट असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. नुकतेच याबद्दलची एका मुलाखतीत प्रार्थनाने माहिती देत मोठा खुलासा केला आहे. प्रार्थनाने स्पष्ट बोलताना आम्हा दोघांना मुलं नको असल्याचे तिच्या युट्यूब चॅनेलवर म्हटलं आहे.
संबधित बातम्या
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नुकतेच तिचा स्वतः चा युट्यूब चॅनल सुरू करून चाहत्याच्या संपर्कात आली आहे. या चॅनेलवरून तिने तिच्या चाहत्यांसोबत दिल खुलास गप्पा गोष्टी मारल्या आहेत. याच दरम्यान तिने वैयक्तीक जीवनातील लग्न आणि प्रेग्नेंट असल्याच्या अफवेवर मौन सोडले आहे. हा प्रार्थनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून प्रार्थनाने तिच्या अलिबाग येथील घराची झलक दाखविली आहे.
दरम्यान तिला 'स्वतःबद्दल ऐकलेली एक अफवा सांग?' असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देताना प्रार्थनाने मध्यंतरी मी प्रेग्नेंट असल्याने काम करायचं बंद केले असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. याआधी मी एका कार्यक्रमादरम्यान पोलका डॉट ड्रेस परिधान केला होता. यानंतर नेटकऱ्यांनी मी प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यावेळी मला खूपच त्रासदायक वाटले. कारण, असे काहीही नव्हते. ही पसरलेली अफवा माझ्या कानावर आल्याने थोडा त्रास झाला. परंतु, काही काळानंतर सर्वकाही विसरून गेलं आणि पूर्वीप्रमाणे सर्व ठीक होवून टेन्शन गेलं. प्रार्थनाने स्पष्ट बोलताना आम्हा दोघांना मुलं नको असून घरातील पाळीव प्राणी आम्हची मुलं असल्याचे युट्यूब चॅनेलवर म्हटलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय.
हेही वाचा :