Prarthana : कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले; नेहा- यशचा रोमान्स

Prarthana : कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले; नेहा- यशचा रोमान्स
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिकेतील नेहा आणि यशची जोडी चाहत्याच्या घराघरातच पोहोचली आहे. नेहा म्हणजे, मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ( Prarthana Behere ) आणि यश म्हणजे श्रेयस तळपदे यांनी धमाकेदार भूमिका मालिकेत पाहायला मिळतेय. सध्या मालिकेत मंगळागौरीचे खेळ सुरू असून, तो चांगलाच रंगलाय. याच दरम्यान नेहाच्या लूकही चाहत्यांना भावला.

नुकतेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने ( Prarthana Behere ) तिच्या इन्स्टाग्रामवर यशसोबतचा एक रोमॅटिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत प्रार्थना मंगळागौरीसाठी खास नऊवारी साडीत ग्लॅमरस दिसतेय. यशने यावेळी ब्लॅक रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला असून यामध्‍ये ताे हॅडसम दिसतोय. केसांची स्टाईल, नउवारी साडी, गजरा, नथ, साजेशीर दागिन्यांनी प्रार्थनाचे सौदर्य आणखी खुलले आहे. या व्हिडिओला तिने 'हे गाणे माझे आवडते आहे ?' असी हटके कॅप्शन लिहिली आहे.

या व्हिडिओत पहिल्यांदा नेहा चालत-चालत यशजवल येताना दिसतेय. तर कधी नेहाच्या डोळ्यात अचानक पाणी तर कधी ती मनमोकळे पणाने हसताना दिसतेय. तर कधी यश तिचा हात आपल्या हातात घेतो. तर कधी तिला गुलाबाचा फूल देताना दिसतोय. व्हिडिओमध्ये 'थोडी सागर निळाई, थोडी शंकर शिंपले, कधी चांदणे टिपूर, तुझ्या डोळ्यात वाचले… असे मराठी गाण्याचे बोल ऐकायला मिळतात. यावेळी नेहाने गुलाबी साडीसोबत मोरपंखी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.

या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'Sundarrrrrr ❤️', 'Love u both neyash ?', 'Beautiful ❣️?', 'Wahhhhh ?', 'Awesome awesome awsome?', 'looking gorgeous ?❤️', 'Wow nice ???', 'खूप सुंदर…..??❤️❤️', 'कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले..??️', 'Nice ❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला आतापर्यत जवळपास २५ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news