Kiran Mane : ‘दंगल काय अशीच घडत नाही, तर मोठा प्लॅन करून घडवून आणली जाते’ | पुढारी

Kiran Mane : 'दंगल काय अशीच घडत नाही, तर मोठा प्लॅन करून घडवून आणली जाते'

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने ( Kiran Mane ) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्याच्या प्रखट आणि स्पष्ट व्यक्तव्यासह बिनधास्तपणे मत मांडताना दिसत असतात. सध्या ‘माझा सातारा असा नव्हता’ असे सांगत किरण मानेंनी साताऱ्यात घडलेल्या दंगलीबद्दल स्पष्टपणे आपले मत मांडले. नुकतेच झालेल्या साताऱ्यातील वंचित आघाडीच्या सभेला त्यांनी हजेरी लावली होती. त्यात ते बोलत होते.

संबधित बातम्या 

साताऱ्यातील नुकतेच वंचित आघाडीची सभा पार पडली. या सभेत किरण मानेंनी घडलेल्या दंगलीबद्दल आपले मत मांडताना जोरदार भाषण केले. ‘नागपुरात मी शूटिंग करत होतो त्याच दरम्यान माझ्यापर्यत सातारा येथील पुसेसावळीतील घटनेची माहिती मिळाली. यानंतर माझ्या विश्वासच या घटनेवर बसला नाही. काही क्षणार्धात सातारा असा नाहीच विचार माझ्या मनात आला.’ असे ते म्हणाले.

‘शाहू महाराज, जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार साताऱ्याच्या मातीत रुजलेले आहेत, तेथे असे घडाले यामुळे मला खूपच वाईट वाटले. एवढी मोठी घटना काय अशीच घडली नाही. तर त्याच्या मागे काहीतरी मोठा प्लॅन असला पाहिजे. जर शेजारी-पाजारी कुणीतरी दंगल सुरू झाली म्हटलं की, आपण लगेच स्वत: च्या घराची दारवाजे आणि खिडक्या लावून घेतो. मग दंगल करायला जाणे ही लांबचीच गोष्ट आहे. त्यामुळे ही घटना घडवून आणण्यासाठी मोठा प्लॅन केलेला असावा. दंगल घडवण्यासाठी सुरूवातीला चार- दोन मातेफिरू तरूणांची डोकी भडकावयाची आणि नंतर त्यात भाडोत्री गुंड घालून दंगल घडवून आणायची असे ठरलेले असते. सध्यकालीन तरूणांना खोटा इतिहास सांगून डोके भडकावण्याचे काम सुरू आहे. या प्रकारापासून स्वत: च्या मुलांना वाचवा. देशापुढे सातारा जिल्ह्याचा आदर्श राहिला पाहिजे असे वागा.’ असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

Back to top button