Sanjay Dutt : संजय दत्तचा ‘लियो’ नं रजनीकांतच्या ‘जेलर’ चा मोडला विक्रम

Sanjay Dutt
Sanjay Dutt

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता थलपती विजय आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त ( Sanjay Dutt ) यांचा धमाकेदार 'लियो' चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. साऊथ स्टार थलपती विजयच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. याच दरम्यान आज सर्वत्र हिंदीसोबत तमिळ, तेलुगू, कन्नड आमणि मळयालम भाषेत धमाकेदार 'लियो' चित्रपट रिलीज झाला. एकिकडे चित्रपट रिलीज झाल्यानंतर संजय दत्त गुगल ट्रेंन्डवर आला आहे. तर दुसरीकडे चाहत्यांनी चित्रपटाविषयी भरभरून कौतुक करताना अनेक रिव्ह्यू व्हायरल केले आहेत. दरम्यान या चित्रपटाने पहिल्या दिवशी जबरदस्त ओपनिंग करत बॉलिवूड अभिनेता रजनीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.

संबंधित बातम्या 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता संजय दत्त आणि विजयच्या 'लिओ' चित्रपटाने पहिल्याच दिवशी ॲडव्हान्स बुकिंगमधून ४६.५ कोटी रुपयांची भरघोष कमाई केली आहे. यावरून 'लिओ'ने पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेता रजनीकांत यांच्या 'जेलर' (पहिल्या दिवसांची कमाई ४४.५) चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. तर दुसरीकडे असेच आकडे पुढच्या काही दिवसात राहिल्यास प्रभासचा 'आदीपुरूष' आणि शाहरूख खानच्या 'जवान' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढले असे निर्मात्यांनी म्हटलं आहे. थलपती विजयच्या चित्रपटासाठी सतत चाहते आतुर असतात. यामुळे चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढण्याची देखील शक्यता असते.

संजयचा 'लिओट चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज झाला आहे. चित्रपटाचे बजेट २५० ते ३०० कोटी रूपयांचे आहे. या चित्रपटात थलपती वियज आणि संजय दत्तने मुख्य भूमिका साकारली आहे. दरम्यान चाहत्यांनी चित्रपटातील वियजचे ॲक्शन सीन आवडल्याने भरभरून कौतुक केलं आहे. तर संजय दत्तच्या खलनायकाच्या भूमिकेवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर अनेक रिव्ह्यू व्हायरल होत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news