पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी याच्यावर एका इराणी महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. म्हैसूर येथील व्हीव्ही पुरम पोलिस ठाण्यात आदिलवर गुन्हा दाखल झाला आहे. राखी सावंतने केलेल्या फसवणुकीच्या आरोपांनंतर याआधीच त्याला अटक केली असून, त्याला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राखी सावंत ने तिचा पती आदिल खान दुर्रानीवर फसवणूक आणि घरगुती हिंसाचार यासारखे गंभीर आरोप केले होते. राखीने केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. कोर्टात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालय़ीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता आदिल याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
एका इराणी महिलने आदिल खानवर बलात्कार आणि धमकावण्याचा आरोप केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, म्हैसूरमध्ये एकत्र राहत असताना लग्नाच्या अमिषाने तिच्यावर त्याने बलात्कार केला. पाच महिन्यांपूर्वी तिने त्याला लग्न करण्यास सांगितले, तेव्हा त्याने अनेक मुलींसोबत असेच संबंध असल्याचे सांगून नकार दिला. त्यानंतर त्याने त्या महिलेचे अश्लील फोटो पाठवले. कोणत्याही प्रकारची तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे तिने तक्रारीत म्हटलं आहे.
हेही वाचा :