Malaika Arora : ऑफ शोल्डर ग्रीन ड्रेस; मलायकाच्या तिरक्या नजरेने चाहते क्लीन बोल्ड

Malaika Arora
Malaika Arora

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि पती अरबाज खान यांच्या घटस्फोटानंतर दोघेजण विभक्त झाले. यानंतर मलायका बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला आणि अरबाज खान त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया (georgia) हिला डेट करू लागले. दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगलेली असते. मलायकाने अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाच्या ब्रेकअपबाबत खुलासा केला आहे. याच दरम्यान मलायकाचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) नुकतेच एका ज्वेलरीच्या जाहिरातीसाठी नुकतेच फोटोशूट केलं आहे. यावेळी तिने ग्रीन रंगाच्या ड्रेससोबत त्याच कलरचे खास आकर्षित ब्रेसलेट परिधान केलं आहे. यातील खास म्हणजे, मलायकाने किलर पोझ दिली असून तिच्या डोक्यावर ग्रीन रंगाची ओढणी खूलून दिसतेय. हा फोटो तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला तिने भले मोठे कॅप्शन लिहिले आहे. सिंपल लूकमध्ये मलायका ऑफ शोल्डर असून खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.

Malaika Arora
Malaika Arora

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. यात एका युजर्सने 'Stunning', 'ati sundar &tikaoo??', 'You are very nice', 'Nice ?', 'Beautiful ??', 'So beautiful ❤️❤️❤️', 'Tum husn pari Tu jane jaha ? tum sbse hasi tum sabse jwa ? sondrya sabun nirma ??', 'Bakvak over acting, ??', 'looking osm mam ❤️❤️', 'princess of Bollywood', 'Wow wow', 'Gorgeous❤', 'Amazing ? girl'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजी शेअर केल्या आहेत.

याच दरम्यान मलायकाने तिचा पती अरबाज आणि गर्लफ्रेंड जॉर्जियाच्या ब्रेकअपबद्दल माहिती दिली. 'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये मलायका आणि दिग्दर्शक करण जोहर याच्यात चर्चा रंगली. यावेळी तिला अरबाजच्या ब्रेकअपबाबत प्रश्न विरण्यात आला. यावर उत्तर देताना मलायकाने 'या ब्रेकअपबद्दल मला काहीच माहिती नाही. मी या विषयावर अरबाज किंवा मुलगा अरहान दोघांशीही चर्चा केलेली नाही.' असे म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news