Single Movie : रमेश परदेशी नगरसेवकाच्या भूमिकेत; राजकारणावर येतोय चित्रपट

Single Movie : रमेश परदेशी नगरसेवकाच्या भूमिकेत; राजकारणावर येतोय चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या दमदार अभिनयाने कायम चर्चेत राहणारे अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई लवकरच नगरसेवक म्हणून कार्यरत होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिनय सोडून पिट्याभाई राजकारणात का सक्रिय होत आहेत? हा प्रश्न पडला असलेच? तर हे 'नगरसेवक' पद त्यांनी आपल्या आगामी 'सिंगल' या चित्रपटासाठी स्विकारलं आहे. या चित्रपटात 'नगरसेवक राजाभाऊ सूर्यवंशी' ही भूमिका ते साकारणार आहेत. विशेष म्हणजे, 'सिंगल' ( Single Movie ) चित्रपटात पुण्यातील विविध राजकीय पक्षांचे विद्यमान नगरसेवक वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. २७ ऑक्टोबरला 'सिंगल' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

संबधित बातम्या 

'सिंगल'च्या ( Single Movie ) निमित्ताने मी प्रथमच पडद्यावर एका राजकारणी व्यक्तिमत्वाची भूमिका साकारतोय. राजकारण व समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. राजाभाऊ सूर्यवंशी या भूमिकेने मला ही वेगळी संधी दिली असून माझी ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करेल, असा विश्वास रमेश परदेशी यांनी व्यक्त केला आहे.

दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी 'सिंगल' चित्रपटाचे दिगदर्शन केले आहे. किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक, 'सिंगल' हे या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम हे आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news