Veda Movie : तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम एकत्र? | पुढारी

Veda Movie : तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम एकत्र?

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅन-इंडिया म्हणून जी अभिनेत्री सध्या टॉप लिस्टवर आहे, ती म्हणजे तमन्ना भाटिया! (Veda Movie) जी करदा मधील तिच्या अभिनयामुळे ती चर्चेत आली. आता तिच्या बद्दल अजून एक गोष्ट समजते ती म्हणजे जॉन अब्राहम वेदा चित्रपटात ती दिसणार आहे. या दोन प्रतिभावान कलाकारांना एका पडद्यावर पाहणे एखाद्या व्हिज्युअल ट्रीटपेक्षा कमी नसणार यात शंका नाही. सूत्रांनी या बाबतीत एक मनोरंजक अपडेट देत ते दोघे स्क्रीन शेयर करणार असल्याचं सांगितलं आहे. (Veda Movie)

सूत्रांनुसार, “जॉन अब्राहमसोबत तमन्ना भाटिया एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. लवकरच अधिक गोष्टी समजतील.चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले आहे आणि तो ७ वर्षांनंतर एका दमदार कथेसह पुन्हा काम करणार आहे.” तमन्ना आगामी जेलर, भोला शंकर, वांद्रे आणि अशा अनेक चित्रपटात दिसणार आहे.

Back to top button