सम्राट पृथ्वीराज : अक्षयचा सलग दुसरा फ्लॉप; रिकाम्या थिएटरमुळे ओढावली ‘ही’ नामुष्‍की

akshay kumar
akshay kumar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुमारे २०० कोटी रुपये खर्च करून निर्मिती करण्यात आलेला सम्राट पृथ्वीराज या सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्ण अपयशी ठरला आहे. आतापर्यंत या सिनेमाने जेमतेम ५५ कोटींचा व्यवसाय केला आहे. प्रेक्षकांमुळे थिएटर रिकामे असल्याने बऱ्याच ठिकाणी या सिनेमाचे शो कॅन्सल करावे लागले आहेत.

अक्षय कुमारचा बच्चन पांडे या सिनेमाही सुपर फ्लॉप ठरला होता. आता सम्राट पृथ्वीराजही बॉक्स ऑफीसवर आपटला आहे.
यशराज फिल्मने या सिनेमाची निर्मिती केली हाेती. या सिनेमाचे व्हीएफएक्स, वेशभूषा, सेट्स या फार मोठा खर्च करण्यात आला आहे.
सम्राट पृथ्वीराजच्या आधी कंगणा रनौतचा 'धाकड'ही बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता.

सम्राट पृथ्वीराज या सिनेमा ३ जूनला रीलीज झाला. या सिनेमाची थेट स्पर्धा मेजर आणि कमल हासनच्या विक्रम या सिनेमांशी झाली. मेजर आणि विक्रम या दोन सिनेमे बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करत असताना सम्राट पृथ्वीराज मात्र प्रेक्षकांना आकर्षित करण्यात पूर्णपणे अपय़शी ठरला आहे.

सम्राट पृथ्वीराज आणि जयेशभाई जोरदार हे दोन्ही सिनेमे यशराजची निर्मिती होती. या वर्षी यशराजचे सलग दोन सिनेमे बॉक्सऑफीसवर अपयशी ठरले आहेत.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news