पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन ( abhishek struggle) याच्या नव्या 'बॉब बिश्वास' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. खूप दिवसांनी त्याचा चित्रपट आलायं. यानिमित्त दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने आपल्या मनातील वेदना बोलून दाखवली. अभिषेकच्या बॉलीवूडमधील कारकीर्दीला २१ वर्ष पूर्ण होतायत. सुरुवातीच्या काळातील संघर्षाचे दिवसांमध्ये भोगलेल्या वेदनांची सल आजही त्याच्या मनात कायम आहे. ( abhishek struggle) मुलाखतीमध्ये त्याने आपल्या संघर्षातील दिवसांना उजाळा दिला. ही मुलाखत अमिताभ बच्चन यांना कमालीची आवडली. त्यांनी यावर अभिषेकला मोलाचा सल्लाही दिला आहे.
अभिषेक बच्चन याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते वर्ष होते २०००. चित्रपट होता 'रिफ्यूजी'. या चित्रपटात त्याची अभिनेत्री होती करीना कपूर. करीनाचाही हा पहिलाच चित्रपट होता. चित्रपट रसिकांना ही जोडी आवडली. दोघांचा कामाचं कौतुकही झालं. मात्र 'रिफ्यूजी' चित्रपटानंतर करीना कपूर स्टार झाली. तिला प्रचंड यश मिळालं. मात्र याच काळात अभिषेक बच्चन याला आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्याची तुलना थेट त्याचे वडील आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशीच झाली. त्यामुळे अभिषेक झाकोळला गेला. त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. तेथूनच त्याचा खर्या अर्थाने संघर्ष सुरु झाला.
मुलाखतीमध्ये आपल्या संघर्षाच्या दिवसांबाबत बोलताना अभिषेक म्हणाला की, मला माझा पहिला चित्रपट मिळवण्यासाठी दोन वर्ष संघर्ष करावा लागला होता. आजही अनेक लोकांना वाटतं की, मी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे त्यामुळे माझ्या दारात लोक २४ तास काम घेवून उभेच असतील;परंतू असे काहीच नव्हतं. मी बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सर्व दिग्दर्शकांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी माझ्याबरोबर काम करण्यास नकार दिला. व्यावहारिकदृष्ट्या ते बरोबरही होते, असेही तो म्हणाला.
मी बॉलीवूडमधील बेरोजगारीही पाहिली आणि यशही अनुभवले आहे. तुम्ही हे व्यक्तिगत घेवू शकत नाही. अखेर चित्रपट हा एक उद्योग आहे. तुमचा एक चित्रपट फ्लॉप ठरला तर तुमच्याबरोबर दुसरा चित्रपट करण्यास कोणीही तयार होत नाही. तुमच्यावर कोणीच पैसे लावत नाही, हे वास्तव आहे, असेही अभिषेक याने सांगितले.
मागील काही वर्षांमध्ये बॉलीवूडमधील 'घराणेशाही'वर (नेपोटिज्म) चर्चा होते. आपण सर्वजण विसरलो की, एखाद्या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतं. त्यामुळे बॉलीवूडमधील 'घराणेशाही'वरील चर्चा सोयीनुसार होते, असे मला वाटते.मागील २१ वर्ष मी बॉलीवूडमध्ये आहे. संघर्षाच्या काळात मी खूप सोसलं आहे. खूप वेदना झाल्या. संघर्षाच्या काळातील दिवस खूपच खडतर होते, अशी खंतही यावेळी अभिषेकने बोलून दाखवले.
अभिषेक बच्चन याची ही मुलाखत अमिताभ बच्चन यांना खूपच आवडली. यावर त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की,"आयुष्यात संघर्षाशिवाय काही मिळत नाही. मला तु केलेल्या संघर्षावर गर्व आहे. मी अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्या आजोबाचे आशीर्वाद प्रत्येक पिढीसोबत राहणार आहेत.
हेही वाचलं का?
पाहा व्हिडिओ :