alia bhatt
मनोरंजन
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची बर्लिन फेस्टिव्हलमध्ये निवड
पुढारी ऑनलाईन
आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका असलेला संजय लीला भन्साळी दिग्दर्शिथ 'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट फेब्रुवारीत बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहे. या फेस्टिव्हलद्वारे या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होत आहे. या फेस्टिव्हलमधील बर्लिन स्पेशल या विभागात या चित्रपटाचे स्क्रीनिंग होणार आहे. यात विभागात ठराविकच चित्रपट दाखवले जात असतात. भन्साळींनी हा माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचे म्हटले आहे.
'गंगुबाई काठियावाडी' चित्रपट म्हणजे माझ्यासाठी स्वप्नपूर्ती असल्याचे भन्साळींनी म्हटले आहे. हा चित्रपट 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

