पुढारी ऑनलाईन डेस्क
'तुझी चिमणी उडाली भूर माझा पोपट पिसाटला' या गाण्याने अक्षरश: प्रत्येकाला ठेका धरायला भाग पाडलं होतं. आजदेखील डीजेवर हे गाणं वाजलं की, एकचं ताल धरला जातो. तुम्हाला माहितीये का, ठसकेबाज मराठमोळं गाणं एका अमराठी अभिनेत्रीवर चित्रीत करण्यात आलं होतं. ती अभिनेत्री आहे गुरलीन चोप्रा. (Gurleen Chopra) गुरलीन चोप्रा हिला एका कार्यक्रमात जेव्हा या गाण्याचा अर्थ माहितीये का, असं विचारण्यात आलं, तेव्हा सर्वांमध्ये एकचं हसू पिकलं होतं. तिला या गाण्याचा अर्थ माहित नव्हता. पण, तिने गाण्यात एक्सप्रेशन्स मात्र जबरदस्त दिले होते. (Gurleen Chopra)
तुम्हाला माहितीये का, गुरलीनचा तुझी चिमणी उडाली भूर गाण्यात मराठमोळा अंदाज दिसला होता. गुरलीन चोप्राचा जन्म चंडीगढमध्ये झाला. शिक्षण झाल्यानंतर ती मॉडलिंगमध्ये गेली. मॉडलिंगमध्ये तिने आपले लक्ष केंद्रित केलं. तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगढमध्ये पूर्ण झालं.
गुरलीन एक पंजाबी अभिनेत्री आहे. तिने हिंदी, तेलुगु, तमिळ, कन्नड, पंजाबी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती भोजपुरी चित्रपटात देखील दिसली.
तिने २००३ मध्ये बॉलिवूड चित्रपट इंडियन बाबू मधून पदार्पण कले. त्याचवर्षी 'Aayudham' आणि २००७ मध्ये 'Thullal' या दाक्षिणात्य चित्रपटात तिने अभिनय केला. 'Hashar' हा २००८ मध्ये आलेला तिचा चित्रपट होता. तिने २०१५ मध्ये 'Shinma' हा मराठी चित्रपट केला होता. यातील गाणे तुझी चिमणी उडाली भूर सुपरहिट झाले. हे गाणे गुरलीनवर चित्रीत करण्यात आले होते.
वयाच्या १७ व्या वर्षी तिने अभिनय कारकिर्दीस सुरूवात केली. मित्रमंडळींच्या
सांगण्यावरून तिने मॉडलिंग करण्यास सुरुवात केली होती. मिस चंडीगढ हा किताब मिळवल्यानंतर तिने चित्रपटात काम करायचं ठरवलं. १२ वीत असताना तिने मिस चंदीगढ हा किताब आपल्या नावे केला होता.
चित्रपट इंडस्ट्रीत जाण्यास तिच्या पालकांचा विरोध होता. पण, Lawrence d'souza दिग्दर्शित चित्रपटात जाण्यासाठी तिला संधी मिळाली. त्यावेळी तिच्या पालकांनी परवानगी दिली.
यानंतर Surjit Bindrakhia चे गाणे sanu tedi tedi takdi tu या गाण्यामुळे ती झळकली.
गुरलीन खूप फिटनेस फ्रिक आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे जिममधील अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात.