पुढारी ऑनलाईन डेस्क :
भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग हा यावर्षी पंजाब राज्यातील राज्यसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.त्याला आम आदमी पार्टीकडून उमेदवारी दिली जावू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ( Harbhajan Singh and AAP )
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ऐतिहासिक यश मिळवले. राज्यातील११७ जागांपैकी ९१ जागा आपने जिंकल्या. बुधवारी भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जालंधर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन
करण्याचे आश्वासन आपने निवडणुकीपूर्वी दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपचे नेते आणि पंजाबचे नूतन
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हरभजन सिंग यांच्याशी संपर्क साधला आहे. त्याला पंजाबमधून होणार्या राज्यसभा निवडणुकीच्या उमेवादरी ऑफर केली आहे.
पंजाबमधील क्रीडा क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये घसरण होत असल्याचे चित्र आहे. आता क्रीडा क्षेत्रात सुधारणा करण्याची जबाबदारी हरभजन सिंग याने घ्यावी, अशी इच्छा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्यक्त केली आहे. हरभजन सिंग हा पंजाबमधील अनेक सामाजिक सेवा कार्यात सहभागी असतो. तब्बल १८ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीनंतर त्याने निवृत्ती घेतली. आता सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आपची खासदारकीची ऑफर हरभजन सिंग
स्वीकारेल, असे मानले जात आहे.
क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर हरभजन सिंग याने पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची भेट घेतली होती. ट्विटरच्या माध्यमातून दोघांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला . यानंतर पंजाब विधानसभा तोंडावर हरभजन सिंग हा काँग्रेसमध्ये प्रवेश करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र ही केवळ चर्चेचा ठरली. हरभजन विधानसभा निवडणुकांपासून लांबच राहिला.
दिल्लीपाठोपाठ पंजाब विधानसभा निवडणुकीत आपने मोठे यश मिळवले आहे. पंजाबमधील राज्यसभेच्या ५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्या आपचे राज्यसभेत तीन सदस्य असून सर्व दिल्लीतील आहेत. आता पंजाबमधील राज्यसभेच्या सर्वच जागांवर निर्विवाद यश मिळविण्यासाठी आप सज्ज आहे. यामध्ये हरभजन सिंगला संधी मिळेल, असे मानले जात आहे.
हेही वाचलं का?