कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यासह राज्यभर एसीबी छापे ; तब्बल 78 ठिकाणी कारवाई, 18 अधिकारी जाळ्यात | पुढारी

कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यासह राज्यभर एसीबी छापे ; तब्बल 78 ठिकाणी कारवाई, 18 अधिकारी जाळ्यात

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) 200 अधिकार्‍यांनी एकाचवेळी राज्यातील 78 ठिकाणी छापे टाकले. त्यात गोकाक तालुक्यातील कौजलगी येथील विभागीय कार्यकारी अभियंता बसवराज शेखररेड्डी यांच्या निवासावरही छापा घालण्यात आला. त्यांच्या मालमत्तेची चौकशी दिवसभर सुरु होती.

त्याशिवाय विजापूर जिल्ह्यातील अधिकार्‍यांच्या निवासावरही छापा घालण्यात आला. त्याचे स्नानगृह पाहून अधिकारी चक्रावून गेले. शेखररेड्डी यांच्याकडे उत्पन्‍नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. शेखररेड्डी यांच्या अपार्टमेंटटी एसीबी अधिकार्‍यांनी दिवसभर तपासणी केली. यावेळी घरातील सर्वांचे मोबाईल स्वीचऑफ करण्यात आले होते. कुणालाही बाहेर सोडण्यात आले नाही. कारवाईची माहिती गुप्‍त ठेवण्यात आली होती.

बाथरुम आलिशान : विजापुरातील निर्मिती केंद्राचे योजनाधिकारी गोपीनाथ माळगी यांच्या विजापूर-सोलापूर रोडरवरील निवासावर एसीबीने छापा घातला. आलिशान बाथरुम पाहून एसीबी अधिकार्‍यांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले. घरामध्ये अनेक किमती वस्तू, होत्या. निवासासह कार्यालय, निर्मिती केंद्राचे स्टोअर, हिशोब तपासणी विभागातील मल्‍लम्मा यांचीही चौकशी करण्यात आली.
बंगळूर परिवहन खात्याचे अतिरिक्‍त आयुक्‍त ज्ञानेंद्र कुमार, बीडीए योजना विभागाचे अधिकारी राकेशकुमार, औद्योगिक आणि वाणिज्य विभागाचे अतिरिक्‍त संचालक बी. के. शिवकुमार यांच्या निवास आणि कार्यालयांवर एसीबी अधिकार्‍यांनी एकाचवेळी छापे घालून तपास केला.

अधिकार्‍याकडे नोटा मोजण्याचे यंत्र

छाप्यांमध्ये कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता आढळल्याचे समजते. रोख, भूखंड, बंगला, आलिशान वाहन, दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने, चंदनाची लाकडे अशा स्वरुपात मालमत्ता आढळली. बदामीतील विभागीय वनाधिकारी शिवानंद खेडगी यांच्या निवासात छाप्यावेळी नोटा मोजण्याचे यंत्र सापडले. शिवाय चंदनाची लाकडेही सापडली.

हेही वाचलत का ?

Back to top button