जालना : गाय चारण्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून; ६ संशयित ताब्यात

जालना : गाय चारण्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून; ६ संशयित ताब्यात

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील करंजळा येथे एका शेतकऱ्याचा शेतात गाय चारण्याच्या किरकोळ वादातून निर्घृण खून करण्यात आला आहे. रामा पिराजी घुले (वय ४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी सहा संशयिताविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील करंजळा येथील शेतकरी रामा पिराजी घुले यांची गाय शेतालगत असलेल्या अशोक रामा सावंत यांच्या शेतात दुपारी चरत होती. यानंतर आमच्या शेतात गाय का चारली? या कारणावरून बुधवारी (दि. ४) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वाद झाला. या वादात अशोक सावंत यांच्यासह ६ जणांनी काठ्या, कुऱ्हाडीने रामा घुले यांच्यावर हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.

घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सपोनि सुभाष सानप यांनी पोलीस अंमलदार मदन गायकवाड, संदीप कुटे, नागरगोजे यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेवून सहा संशयितांना ताब्यात घेतले. मयताचा मुलगा अभिषेक घुले याच्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात अशोक रामा सावंत, लहू रामा सावंत, दत्ता लहू सावंत, रामेश्वर अशोक सावंत, शंकर लक्ष्मण धुमक व भगवान लक्ष्मण धुमक यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. रामा घुले यांचा मृतदेह अंबड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news